पोलीस उपनिरीक्षक सूरज विष्णू चंदनशिवे वय 42 यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. ही घटना सांगोला तालुक्यातील वासूद परिसरात घडली. रात्री जेवल्यानंतर शतपावली करण्यासाठी सूरज हे आपल्या घरापासून थोडं दूर गेले. केदारवाडी रस्त्यावर ते शतपावली करत होते.
एक फोन अन् अख्ख पोलीस स्टेशन हादरलं; नागपुरात नेमकं काय घडलं?
याच दरम्यान तिथे दबा धरुन बसलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. यामध्ये त्यांचं मृत्यू झाला आहे. शतपावली करुन बराचवेळ उलटला तरी सूरज हे घरी आले नाहीत. त्यामुळे घरच्यांना काळजी वाटू लागली. कुटुंबियांनी शोध घेतला असता लासूद केदारवाडीजवळ पोलीस उपनिरीक्षक केदार यांचं मृतदेह आढळून आला आहे.
advertisement
कुटुंबियांनी याची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी पोलीस फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. सूरज यांचा मृतदेह रुग्णवाहिकेतून शवविच्छेदनासाठी सांगोला ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. या प्रकरणी अज्ञात हल्लेखोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास करत आहेत.
