आशीर्वाद घेण्यासाठी उतरले आणि साधूंनी लुटले दागिने
ललिता नरेंद्र पाटील (वय-38, रा. खाचणे, जि. जळगाव) या आपल्या कुटुंबासह 22 ऑगस्टला दुपारी क्रूझर गाडीतून धुळ्याकडे निघाल्या होत्या. पाटील कुटुंब तुळजापूर आणि पंढरपूर देवदर्शन घेऊन परतत होतं. या घाटात साधूच्या वेशात उभारलेल्या काही व्यक्तींना पाहून ड्रायव्हरने गाडी थांबवली. या साधूंचा आशीर्वाद घ्यावा, या उद्देशानेही गाडी थांबवली होती.
advertisement
गाडी थांबवल्यानंतर पाटील कुंटुबाने त्यांचा आशीर्वाद गाडीतून उतरलं. याच संधीचा फायदा घेत साधूंच्या टोळीतील एकाने चाकू काढला आणि धमकावण्यास सुरूवात केली. ललिता पाटील यांची आई सुनंदाबाई आणि सासू सरलाबाई यांनी साधूंनी गाडीबाहेर थांबवलं आणि बाकिच्यांना गाडीत बसण्यास सांगितले.
या साधूंच्या टोळीने चाकूचा धाक दाखवत 'सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा', अशी धमकी देत महिलांच्या गळीतील दागिने काढून घेण्यास सांगितले. सासू सरलाबाई यांनी त्यांच्या गळ्यातील दागिने काढून दिले. या टोळीने 1 लाख 5 हजारांचे दागिने लुटले आणि त्यांच्या कारमध्ये बसून पसार झाले.
सर्व आरोपी परराज्यातील...
या गुन्ह्यात पकडण्यात आलेले पाच आरोपी हे उत्तराखंड राज्यातील हरिद्वार जिल्ह्यातील आहेत. विक्की मोसमनाथ नाथसफेरे (वय-25), सौदागर बाबूनाथ नाथसफेरे (वय-24), गोविंद कल्लूनाथ नाथसफेरे (वय-35), जागीरनाथ बाबूनाथ नाथसफेरे (वय-23) आणि क्रांता मोसमनाथ नाथसफेरे (वय-25) अशी अटकलेल्या आरोपींची नावे आहेत.
हे ही वाचा : Nashik News: चिमुकलीला नदीत फेकले, बापनेही घेतली उडी; तपासात कळलं की, "बायको स्वतःच्या मुलीला..."
हे ही वाचा : सावधान! WhatsAppमधील 'या' लिंक्स चुकूनही करू नका क्लिक; अन्यथा बँक खातं होईल रिकामं, कशी घ्याल काळजी?