Nashik News: चिमुकलीला नदीत फेकले, बापनेही घेतली उडी; तपासात कळलं की, "बायको स्वतःच्या मुलीला..."
- Published by:Arjun Nalavade
Last Updated:
Nashik News: कामावर गेल्यानंतर घरी बायको मुलीला व्यवस्थित सांभाळत नसल्यामुळे पती-पत्नीमध्ये सतत वाद होत होते. याच रागातून पतीने आपल्या...
मालेगाव : कामावर गेल्यानंतर घरी बायको मुलीला व्यवस्थित सांभाळत नसल्यामुळे पती-पत्नीमध्ये सतत वाद होत होते. याच रागातून पतीने आपल्या 4 वर्षांच्या मुलीला नदीत फेकले आणि स्वतःही नदीत उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. परंतु, आजुबाजुच्या काही तरुणांना ही घटना लक्षात येतात, क्षणाचाही विलंब करता त्यांनी दोघांना वाचवण्याची नदीत उडी घेतली आणि दोघांचाही जीव वाचला.
4 वर्षांच्या लेकीला पहिल्यांदा नदीत फेकलं
संबंधित घटना ही मालेगावमधील आहे. या पित्याचे नाव अश्विन पंकज जाधव असून तो अयोध्यानगर मालेगाव येथे राहणार आहे. सविस्तर माहिती अशी की, अश्विन आणि त्याच्या पत्नीमध्ये सतत वाद होत होते. तो कामावर गेला की, 4 वर्षांच्या मुलीला अश्विनची मुलगी व्यवस्थित सांभाळत नव्हती. त्यावरून दोघांमध्ये वाद झाले. या वादातून राग अनावर झाला आणि अश्विन आपल्या 4 वर्षांच्या तेजस्विनीला घेऊन टेहरा फाट्यावरील गिरणा नदीजवळ आला.
advertisement
रस्त्यावरच्या तरुणांना वाचवले दोघांचे प्राण
पहिल्यांदा याने आपल्या 4 वर्षांच्या लेकील नदीत फेकून दिले आणि त्यानंतर स्वतःही आत्महत्या करण्यासाठी नदी उडी घेतली. परंतु रस्त्यावरून जाणाऱ्या काही तरुणांच्या लक्षात ही बाब आहे. त्यांनी कशाचाही विचार न करता थेट नदीत उडी घेतली. जिवाची बाजी लावून दोघा बाप-लेकीचे प्राण वाचवत त्यांना किनाऱ्यावर आणले. अग्निशमनदलाने वेळीच धाव घेऊन चिमुकलीला रुग्णालयात दाखल केले. या घटनेनंतर मुलीच्या बापाला पोलिसांनी ताब्यात घेतले आणि पुढील तपास सुरू केला.
advertisement
हे ही वाचा : Satara Crime: 'चल, साहेबांना लुटूया', 40 हजारांच्या कर्जासाठी 2 मित्रांनी रचला खतरनाक प्लॅन; घेतला कोयता आणि...
हे ही वाचा : सिंधुदुर्ग हादरलं! मध्यरात्री खूनी खेळ, घरात झोपलेल्या महिलेला करंट देऊन मारण्याचा प्रयत्न, कारण काय?
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 25, 2025 3:23 PM IST
मराठी बातम्या/क्राइम/
Nashik News: चिमुकलीला नदीत फेकले, बापनेही घेतली उडी; तपासात कळलं की, "बायको स्वतःच्या मुलीला..."


