TRENDING:

Crime News : प्रेमाच्या जाळ्यात ओढायच्या अन्..., पैशांसाठी त्या खेळायच्या 'डर्टी गेम'

Last Updated:

या दोन्ही आरोपी महिला आरोपींच्या मदतीने आधी तरुणांना प्रेमाच्या जाळ्यात ओढत होते.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नितिन गौतम, प्रतिनिधी
अटक करण्यात आलेले आरोपी
अटक करण्यात आलेले आरोपी
advertisement

मथुरा, 30 ऑगस्ट : देशात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटना घडत आहेत. अनैतिक संबंधातून खून, बलात्कार तसे आत्महत्येचाही घटना समोर येत आहेत. यातच आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. तरुणांना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांच्याकडून मोठी रक्कम उकळत असल्याच्या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे.

पैसे कमावण्याच्या नादात महिलांनी धक्कादायक कृत्य केल्याचे समोर आले आहे. धर्मनगरी असलेल्या मथुरा येथे ही घटना घडली. याप्रकरणी गोवर्धन पोलिसांनी सीओ राममोहन शर्मा यांच्या नेतृत्वाखाली कारवाई करत ब्लॅकमेल करणाऱ्या टोळीच्या चार जणांना अटक केली. अटक करण्यात आलेल्यांमध्ये दोन महिलांचाही समावेश आहे.

advertisement

तसेच पोलिसांनी यांच्याकडून 50 हजार रुपये रोख, एक ईको कार जप्त केली आहे. ब्लॅकमेल करणारी टोळी पोलिसांनी पकडून तुरुंगात टाकल्याने काही दिवस त्यांचा हा काळा धंदा बंद राहील, असे बोलले जात आहे. दरम्यान, पोलीस तपासात हेसुद्धा समोर आले आहे की, अटक करण्यात आलेले आरोपी यांनी याधीही एकदा अटक करण्यात आली होती. मात्र, यावेळी पोलिसांकडून टोळीवर कडक कारवाई करण्यात आली आहे, असे सांगितले जात आहे.

advertisement

नेमकं काय प्रकरण -

पोलिसांनी अटक केलेले आरोपी हे रोहतास आणि ऋषिकेश येथील आहेत. या दोन्ही आरोपी महिला आरोपींच्या मदतीने आधी तरुणांना प्रेमाच्या जाळ्यात ओढत होते. मग तरुणांना एका निर्जन भागात बोलावून त्यांच्यासोबत अश्लील कृत्य करत त्याचा व्हिडिओ बनवायचे. यानंतर ब्लॅकमेकिंग सुरू व्हायची. या महिलांनी गोवर्धन येथील रहिवासी बिहारीलाल याला आपल्या जाळ्यात अडकवले. यानंतर हायवे परिसरात बोलवून त्याच्यासोबत अश्लिल व्हिडिओ बनवून त्याला बलात्काराच्या एका खोट्या केसमध्ये अडकवण्याची धमकी देत त्याच्याकडून 50 हजार रुपये उकळले.

advertisement

तसेच त्यानंतर त्यांनी व्हिडिओ व्हायरल करण्याचा धाक दाखवून पीडित व्यक्तीवर आणखी अडीच लाख रुपये मागत दबाव टाकला. त्यामुळे बिहारीलालने संपूर्ण प्रकरणाची माहिती कुटुंबीयांना दिली.

यावेळी बिहारीलालची स्थिती पाहून त्याचे भाऊ डालचंद यांनी पोलिसांना या संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली. यानंतर पोलिसांनी सापळा रचत तरुणांना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांच्यासोबत अश्लिल व्हिडिओ बनवल्यावर त्यांना ब्लॅकमेल करणाऱ्या टोळीला अडिंग बायपास येथून अटक केली आहे. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.

advertisement

मराठी बातम्या/क्राइम/
Crime News : प्रेमाच्या जाळ्यात ओढायच्या अन्..., पैशांसाठी त्या खेळायच्या 'डर्टी गेम'
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल