भागलपूर : आजकाल इंटरनेट ही काळाची गरज झाली आहे, परिणामी सायबर क्राइमदेखील मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. त्यामुळे आपण इंटरनेटचा वापर कमी करण्याची आवश्यकता नाही, परंतु इंटरनेट जपून वापरायला हवं हे नक्की. याबाबत सायबर एक्सपर्ट निशांत यांनी माहिती दिली आहे. त्यांनी आपल्यासोबत सायबर क्राइम होऊ नये यासाठी कशी काळजी घ्यावी हे सांगितलं आहे.
advertisement
निशांत म्हणाले, आजकाल जवळपास सर्वजण ऑनलाइन शॉपिंग करतात. त्यातूनही फसवणूक होऊ शकते. त्यामुळे आपण सुरक्षित लिंकवर क्लिक करतोय ना, याची काळजी घ्यायला हवी. मोबाईलमध्ये विनाकारण दिसणाऱ्या लिंकवर अजिबात क्लिक करू नये.
फोनसाठी हानिकारक आहेत हे 12 अॅप्स! गुपचूप चोरताय तुमचे पर्सनल फोटो आणि डेटा
अशा वेबसाइटवर करू नका क्लिक
आपण कोणत्याही लिंकवर क्लिक केलंत की, तिच्या कोपऱ्यात एक लॉकचं म्हणजेच टाळ्याचं चिन्ह दिसेल. हे चिन्ह नसल्यास त्या लिंकवर अजिबात कोणतीही ऍक्टिव्हिटी करू नये. त्यामुळे आपली स्टिस्टीम हॅक होऊ शकते. त्याचबरोबर तुम्हाला एखाद्या वेबसाइटबद्दल काहीही न कळल्यास त्याबाबत त्वरित तज्ज्ञांचा सल्ला घ्या. कारण अनेकदा आपण नवं तंत्रज्ञान शिकण्याच्या नादात धोकादायक वेबसाइटचा वापर करतो आणि या वेबसाइटमुळे आपली सिस्टीम हॅक होते.
चीनची नवी चाल, Gaming App मधून भारतातल्या मुलांना करतायत टार्गेट
फ्रॉड कॉलपासून राहा सावधान!
अनेकदा आपल्याला काही फ्रॉड कॉल्स येतात. वेगवेगळ्या प्रकारचे आमिष दाखवून आपलं बँक खातं रिकामं करण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे आपण एक गोष्ट कायम लक्षात ठेवावी. काहीही झालं तरी आपली खासगी माहिती आणि मोबाईलवर आलेले ओटीपी कोणालाही द्यायचे नाहीत. शिवाय अशा अनेक वेबसाइट असतात ज्या सुरक्षित नसल्यास तिथे 'यस' ऑर 'नो'चा ऑप्शन येतो. आपण त्यापैकी एक ऑप्शन निवडण्यापूर्वीच यसवर आपोआप क्लिक होतं. असं झाल्यास त्वरित बॅकवर क्लिक करा. नाहीतर आपल्यासोबतही सायबर क्राइम घडू शकतो.
लेटेस्ट बातम्या आणि व्हिडीओ पाहण्यासाठी न्यूज18 लोकमतच्या या अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनलला करा फॉलो...या लिंकवर क्लिक करा https://whatsapp.com/channel/0029Va7W4sJI7BeETxLN6L0g