मेघालय पोलिसांच्या तपासात राजा रघुवंशी यांच्या हत्येचा कट उघड झाला असून, तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे त्यापैकी दोन इंदोरमधून आणि एक उत्तर प्रदेशमधील ललितपूर येथून अटक करण्यात आली. तर या आरोपींनी सोनमसमोर आम्ही राजाला मारल्याची कबुली दिली.
हनिमूनसाठी शिलाँग गेलेल्या राजाचा मृतदेह सापडला होता. तर, सोनमचा थांगपत्ता लागला नव्हता. 23 मे पासून राजा बेपत्ता होता. तर, 2 जून रोजी त्याचा मृतदेह आढळला. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. पोलिसांच्या तपासात राजाची हत्या झाल्याचे समोर आले होते. मात्र, सोनम बेपत्ता असल्याने या प्रकरणातील गूढ वाढले. पोलिसांकडून सोनमचा शोध सुरू होता. अखेर तिने घरच्या लोकांना फोन करून गाझियाबादमधील आपलं लोकेशन सांगितले. त्यानंतर पोलिसांनी ताब्यात घेत तिला अटक केली.
advertisement
धूर्त निघाली सोनम...राजाला ठार करण्यासाठी प्लान बी...
सोनम रघुवंशीने राजाला ठार करण्यासाठी प्लान बी तयार केला होता. इंदूर पोलिसांच्या गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार, सोनम ही धूर्त असल्याचे दिसून येत आहे, प्रियकर राजने पाठवलेल्या मारेकऱ्यांनी राजाला संपवले नसते तर तिने स्वत: प्लान बी तयार केला होता.
काय होता प्लान बी?
आखलेल्या कटानुसार, राजाला मारेकरी धारदार शस्त्राने संपवणार होते. मात्र, त्यांचा हा कट फसला असता तर सोनमने आपलाही प्लान तयार केला होता. प्लान बी नुसार, डोंगरावर सेल्फी घेताना ती राजाला दरीत ढकलून देणार होती. जेणेकरून राजाचा मृ्त्यू हा अपघात असल्याचे भासवता आले असते. पोलिसांना आरोपी राज आणि सोनमचे काही चॅट मिळाले आहेत. त्याशिवाय मोठ्या रक्कमेच्या आर्थिक देवाणघेवाणीचा व्यवहाराचा तपशील पोलिसांना मिळाला आहे.