सोनमच्या कंपनीत काम करायचा राज...
मृत राजा यांचा भाऊ विपिन रघुवंशी यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितले की, 'मला अटक केलेल्या उर्वरित 3-4 जणांबद्दल काहीही माहिती नाही, मला त्यांची नावेही माहित नाहीत... राज कुशवाहाचे नाव समोर आले, याचा अर्थ सोनम रघुवंशी देखील राजाच्या हत्येत सहभागी असल्याचे त्यांनी सांगितले. राज कुशवाह तिचा कर्मचारी होता. ते सतत फोनवर बोलत असत.' सोनम आणि राज व्यतिरिक्त पोलिसांनी आणखी तीन जणांना अटक केली आहे, ज्यांच्यावर हत्येत सहभागी असल्याचा आरोप आहे.
advertisement
लग्न ठरल्यानंतर आनंदी होते सोनम आणि राजा
विपिन रघुवंशी यांनी सांगितले की, त्यांनी कधीही विचार केला नव्हता की सोनम राजाला मारू शकेल. लग्न निश्चित झाल्यानंतर दोघेही खूप आनंदी होते. ते म्हणाले, 'जेव्हा दोघांचे लग्न निश्चित झाले तेव्हा ते खूप आनंदी होते. सोनम असे काही करेल असे कधीही वाटले नव्हते. मेघालय सरकार खोटे बोलत नाही की सोनम राजाच्या हत्येत सहभागी आहे. तिचा त्यात सहभाग असण्याची शक्यता आहे.
'आम्ही कामाख्या मंदिरात जाणार होते, शिलाँगला कसे पोहचले?
विपिन रघुवंशी म्हणाले की राजा आणि सोनम आसाममधील कामाख्या माता मंदिराचे दर्शन घेण्यासाठी घराबाहेर पडले होते, परंतु नंतर ते शिलाँगला गेले. त्यांनी मेघालयला जाण्याचा कसा विचार केला हे आम्हाला माहित नाही. त्यांनी त्यांचे परतीचे तिकीटही बुक केले नव्हते.
5 वर्षांनी लहान असलेल्या राजवर जीव जडला.
पोलिस सूत्रांनुसार, सोनमने शिक्षण घेतल्यानंतर तिच्या वडिलांच्या कंपनीमध्ये काम करायला सुरुवात केली. ती कंपनीत एचआर विभागाची प्रमुख होती. त्याच दरम्यान राज कुशवाहा हा त्यांच्या कंपनीत रुजू झाला होता. तो या कंपनीत मॅनेजर असल्याची माहिती समोर आली. कामाच्या निमित्ताने दोघांमध्ये वारंवार भेटीगाठी सुरू झाल्या. अधिक काळ संपर्कात आल्यानंतर दोघांमध्ये प्रेम जुळले. राज हा सोनमपेक्षा 5 वर्षांनी लहान असल्याची माहिती समोर आली आहे. आपल्यापेक्षा लहान असलेल्या राजवरील प्रेमासाठी सोनमने सप्तपदी घेतलेल्या राजा रघुवंशीचा काटा काढला.
लग्नानंतर अवघ्या 6 दिवसांत राजाच्या हत्येचा कट
सोनम आणि राजाचे 11 मे रोजी लग्न झाले आणि त्यानंतर अवघ्या 6 दिवसांनी सोनमने राजाची हत्या करण्याचा कट रचला होता. सुरुवातीच्या तपासादरम्यान पोलिसांना कळले की सोनमचा प्रियकर राज कुशवाहाने राजाला संपवण्याचा कट रचला होता.