TRENDING:

राजा रघुवंशी हत्याकांडात नवा ट्विस्ट, सोनमच्या मिस्ट्री फ्रेंडचं नाव समोर, सगळं प्रकरणच फिरलं?

Last Updated:

इंदूरच्या उद्योजक राजा रघुवंशी हत्याकांडात सोनम रघुवंशीच्या मैत्रिणी 'अलका'चे नाव समोर आल्याने प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मध्य प्रदेशच्या इंदूर येथील उद्योजक राजा रघुवंशी हत्याकांडात दररोज नवनवीन अपडेट समोर येत आहेत. राजाच्या हत्येचा कट एकटी सोनम रचू शकत नाही. यात आणखी कुणाचा तरी हात असू शकतो, असा संशय राजाच्या कुटुंबीयांकडून व्यक्त केला जात आहे. तसेच सोनमच्या जवळच्या मैत्रिणींची चौकशी करण्याची मागणी देखील केली जात आहे. यामुळे या प्रकरणात आता नवा ट्विस्ट बघायला मिळत आहे. तसेच या प्रकरणात सस्पेन्स देखील वाढत आहे.
News18
News18
advertisement

दरम्यान, या हत्याकांडात मुख्य आरोपी सोनम रघुवंशीच्या मिस्ट्री फ्रेंडचं नाव समोर आल्याने या प्रकरणाला वेगळं वळण लागलं आहे. सोनमच्या 'अलका' नावाच्या मैत्रिणीचं नाव समोर आल्याने एक वेगळाच संशय निर्माण झाला आहे.

राजा रघुवंशीच्या आईने आणि कुटुंबातील इतर सदस्यांनी पोलिसांकडे मागणी केली आहे की, सोनमच्या सर्व जवळच्या मैत्रिणी आणि तिच्यासोबत काम करणाऱ्या मुलींची कसून चौकशी करावी. त्यांची चौकशी केल्यानंतर अनेक धक्कादायक खुलासे होऊ शकतात, असा अंदाज राजाच्या कुटुंबीयांना आहे.

advertisement

मिस्ट्री गर्ल 'अलका' नक्की आहे तरी कोण?

या प्रकरणात ज्या 'अलका' नावाच्या मुलीचा उल्लेख केला जात आहे ती सोनमची जवळची मैत्रीण असल्याचे मानले जाते. आता प्रश्न असा निर्माण होतो की अलका फक्त एक मैत्रीण होती की ती या गुन्ह्यात सहभागी होती? पोलीस सूत्रांनुसार, त्या अनुषंगाने तपास केला जात आहे. राजा रघुवंशीचे कुटुंब अलकाकडे संशयाने पाहत आहेत. तसेच अलकासह सोनमच्या जवळच्या सर्व मैत्रिणींची चौकशी करून सत्य बाहेर आणावं, अशी मागणीही कुटुंबीय करत आहेत.

advertisement

आतापर्यंत या प्रकरणात काय घडले आहे?

राजा रघुवंशीची २३ मे रोजी मेघालयातील शिलाँगमध्ये हनिमूनदरम्यान हत्या करण्यात आली होती. २ जून रोजी राजाचा मृतदेह सापडला. हत्येच्या १७ दिवसांनंतर सोनम स्वतः पोलिसांकडे सरेंडर झाली. त्यानंतर उर्वरित चार आरोपींनाही अटक करण्यात आली. या हत्येमुळे केवळ इंदूरमध्येच नव्हे तर देशभरात खळबळ उडाली. आता या प्रकरणात मिस्ट्री गर्ल अलकाच्या एन्ट्रीमुळे नवा अँगल मिळण्याची शक्यता आहे.

advertisement

सोनमने हा गुन्हा एकट्याने केला नसेल, असा कुटुंबाचा संशय आहे. अलकाच्या भूमिकेबद्दल उपस्थित होणाऱ्या प्रश्नांमुळे तपास यंत्रणांनाही सतर्क झाल्या आहेत. या प्रकरणाकडे केवळ प्रेम प्रकरण किंवा वैयक्तिक शत्रुत्वाच्या पलीकडे जाऊन पोलीस तपास करत आहेत. येत्या काळात अलका आणि सोनमबाबत सखोल चौकशी केल्यानंतर याबाबत विविध धागेदोरे पोलिसांच्या हाती लागू शकतात.

मराठी बातम्या/क्राइम/
राजा रघुवंशी हत्याकांडात नवा ट्विस्ट, सोनमच्या मिस्ट्री फ्रेंडचं नाव समोर, सगळं प्रकरणच फिरलं?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल