TRENDING:

Sonam Raghuwanshi : राजा रघुवंशी मर्डर केसमध्ये जबरदस्त ट्वीस्ट! सीन रीक्रिएशनमध्ये सापडला 'तो' धक्कादायक पुरावा!

Last Updated:

Sonam Raghuwanshi: व्यावसायिक राजा रघुवंशी हत्या प्रकरणात मोठा ट्वीस्ट आला आहे. मेघालय पोलिसांनी मंगळवारी राजाची हत्या झाली, त्या ठिकाणी सीन रीक्रिएशन केला. यामध्ये त्यांच्या हाती महत्त्वाचा पुरावा लागला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Indore Missing Couple:   व्यावसायिक राजा रघुवंशी हत्या प्रकरणात मोठा ट्वीस्ट आला आहे. मेघालय पोलिसांनी मंगळवारी राजाची हत्या झाली, त्या ठिकाणी सीन रीक्रिएशन केला. यामध्ये त्यांच्या हाती महत्त्वाचा पुरावा लागला आहे. त्यामुळे आता सोनम, राज आणि इतर आरोपींचा पाय आणखी खोलात गेला आहे.
राजा रघुवंशी मर्डर केसमध्ये जबरदस्त ट्वीस्ट! सीन रीक्रिएशनमध्ये सापडला 'तो' धक्कादायक पुरावा!
राजा रघुवंशी मर्डर केसमध्ये जबरदस्त ट्वीस्ट! सीन रीक्रिएशनमध्ये सापडला 'तो' धक्कादायक पुरावा!
advertisement

राजा रघुवंशी यांची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली. या हत्येसाठी वापरलेले शस्त्र पोलिसांनी आधीच हस्तगत केले होते. त्यानंतर आता दुसरे शस्त्रही पोलिसांना मिळाले आहे. राजा रघुवंशी यांच्या हत्येसाठी वापरलेला दुसरा डाओ (माचेट) राज्य आपत्ती प्रतिसाद दलाने (एसडीआरएफ) जप्त केला. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, पाच आरोपींनी राजाच्या हत्येत दोन डाओ वापरल्याची कबुली दिली. पहिला डाओ 2 जून रोजी जप्त करण्यात आला, तर दुसरा डाओ हत्येनंतर त्याच ठिकाणी फेकून दिला होता.

advertisement

हत्येसाठी दोन डाओ वापरण्यात आले

पूर्व खासी हिल्सचे पोलिस अधीक्षक विवेक सीयम सीयम म्हणाले की, पहिल्या डाओचा हँडलचा रंग नारंगी होता. हे धारधार शस्त्र 2 जून रोजी जप्त करण्यात आले. त्याच दिवशी राजाचा मृतदेह उंबलाई येथील रियात अरलियांग पार्किंग लॉटमधील वैसावडोंग धबधब्याजवळील एका खोल दरीतून सापडला.

दुसऱ्या डाओला स्टीलचे हँडल..

advertisement

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, खून आरोपीने राजाची हत्या केल्यानंतर त्याच ठिकाणी स्टीलच्या हँडलसह दुसरे शस्त्र टाकले होते. एसडीआरएफ पथकाने घटनास्थळी सखोल शोध मोहीम राबवली. त्यानंतर दुसरा डाओ जप्त करण्यात यश मिळाले

धारदार डाओची फॉरेन्सिक तपासणी होणार...

राजा रघुवंशी हत्या प्रकरणात आतापर्यंत एकाच शस्त्राचा वापर झाल्याचे म्हटले जात होते. त्यानंतर पोलिसांनी सीन रीक्रिएशनच्या वेळी दुसरं शस्त्र सापडले आहे. या डाओला आता फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात येणार आहे.

advertisement

राजाच्या हत्या प्रकरणाच्या तपासात दुसरं डाओ सापडणं हे अतिशय महत्त्वाचं समजलं जात आहे. आरोपींविरोधात भक्कम पुरावे जमा केले जात आहेत. त्यात आता या दुसऱ्या डाओमुळे आणखीच भर पडली आहे.

लवकरच आरोपपत्र होणार दाखल...

त्यांनी राजाला उंबलाई येथील रियात अरलियांग पार्किंग लॉटमध्ये बोलावले आणि तिथे त्याची हत्या केली. त्यानंतर त्यांनी मृतदेह वैसावडोंग धबधब्याजवळील एका खोल खड्ड्यात फेकून दिला. पोलिसांनी 5 आरोपींना अटक केली आहे आणि त्यांची चौकशी करत आहेत. आरोपींनी त्यांचा गुन्हा कबूल केला आहे आणि पोलिसांना हत्येची सविस्तर माहिती दिली आहे. पोलिस आता आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्याची तयारी करत आहेत.

advertisement

मराठी बातम्या/क्राइम/
Sonam Raghuwanshi : राजा रघुवंशी मर्डर केसमध्ये जबरदस्त ट्वीस्ट! सीन रीक्रिएशनमध्ये सापडला 'तो' धक्कादायक पुरावा!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल