राजा रघुवंशीच्या हत्येच्या अगदी आधी दोन वेगवेगळे व्हिडिओ समोर आले आहेत. या व्हिडीओत राजा, आरोपी सोनम रघुवंशी, विशाल, आकाश आणि आनंद दिसत आहेत. या व्हिडिओंमध्ये आनंद कुर्मी वगळता, विशाल चौहान, आकाश राजपूत आणि सोनम रघुवंशी यांनी व्हाइट शर्ट घातला असल्याचे दिसून आले आहे. हा व्हिडिओ इन्स्टा युजर देव सिंह यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. त्यांनी याआधी पहिला व्हिडीओ पोस्ट केला होता.
advertisement
पहिला व्हिडीओ...
सोमवारी पहिला व्हिडीओ समोर आला होता. या व्हिडीओत मेघालयातील डबल डेकर रूट ब्रिजवर प्रवास करताना एका पर्यटकाने हा व्हिडिओ बनवला. या व्हिडिओमध्ये राजा आणि सोनमचे फूटेज दिसून आले आहे. हा व्हिडीओ 23 मे 2025 रोजी सकाळी 9.45 वाजण्याच्या आसपासचे आहे. सोनम पुढे चालत असून राजा तिच्या मागे चालत असल्याचे दिसून आले आहे. सोनमने यावेळी व्हाइट शर्ट घातला असल्याचे दिसून आले आहे.
दुसरा व्हिडीओ समोर, आरोपीदेखील दिसले...
देव सिंह यांनी पोस्ट केलेल्या दुसर्या व्हिडिओमध्ये, हत्येचे आरोपी विशाल चौहान, आनंद कुर्मी आणि आकाश राजपूत हे तिघेही एकत्र ट्रेकिंग करताना दिसत आहेत. व्हिडिओमध्ये, विशाल सगळ्यात पुढे आहे आणि तो थेट कॅमेऱ्याकडे पाहत आहे. त्याने व्हाइट शर्ट देखील घातला आहे. कॅमेऱ्यापासून वाचण्यासाठी आनंद आपला चेहरा बाजूला करतो आणि कॅमेरा त्याच्या जवळ येताच आकाशने मान खाली घातली. त्याच्या लांब केसांमुळे त्याचा चेहरा लपला गेला. आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे आकाशने देखील व्हाइट शर्ट घातला आहे.
या दोन्ही व्हिडीओमध्ये राजा रघुवंशी, सोनम आणि आरोपींनी व्हाइट शर्ट घातला असल्याचे दिसून आले आहे. हत्येच्या दिवशी एकाच रंगाचे शर्ट घालण्याचे कारण काय, असा सवाल निर्माण झाला आहे. त्यामुळे आता हा पूर्वनियोजित कट असल्याच्या चर्चांना बळकटी मिळत आहे. ट्रेकिंगच्या निमित्ताने राजाला फसवणूक करून त्याला संपवले का, हा देखील प्रश्न उपस्थित झाला आहे.
मेघालय पोलिसांनी काय सांगितले?
या प्रकरणाचा तपास करणाऱ्या मेघालय पोलीस महासंचालक इदाशिशा नोंगरांग यांनी सोमवारी सांगितले की, या हत्ये मागे फक्त लव्ह ट्रँगल हे एकमेव कारण असेल असे आम्ही मानत नाही. या प्रकरणात आणखी काही पैलू आहेत का, याचा आम्ही तपास करत आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले. लग्नाच्या काही दिवसातच पतीबद्दल इतका टोकाचा द्वेष निर्माण होणे हे दुर्मिळ प्रकरण असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.