घरात घुसून केली जबर मारहाण अन्...
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना 10 मे च्या रात्री घडली. रात्रीच्या सुमारास आरोपी एका चारचाकीतून आले आणि सेवानिवृत्त कॅप्टनच्या घरात घुसले. घरात प्रवेश करण्यासाठी एका आरोपीने घराच्या भिंतीवरून उडी मारली आणि आतून दरवाजा उघडला. यानंतर, सर्व आरोपींनी मिळून राम सिंह यांना काठ्यांनी बेदम मारहाण करण्यास सुरूवात केली, ज्यामुळे राम सिंह यांचा जागेवरच मृत्यू झाला. यावेळी, कुटुंबातील सदस्यांनी पाहिले की, आरोपी सरपंचाने इतरांनाही जीवे मारण्याची धमकी दिली.
advertisement
घटनेचा व्हिडीओ महत्त्वाचा पुरावा
सेवानिवृत्त कॅप्टन राम सिंह यांचा मुलगा रामलालने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत सांगितलं की, मुलौडी गावाचा सरपंच प्रवीण याचा त्यांच्या कुटुंबाशी विधानसभा निवडणुकीच्या वेळेपासूनच वाद किंवा वैर होतं. दुसरीकडे, घटनेच्या वेळी मृताच्या एका नातेवाईकाने या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ देखील बनवला असून तो पोलिसांना महत्त्वाचा पुरावा म्हणून सादर केला आहे. आरोपी घटनास्थळावरून पळून जात असताना सरपंचाच्या आधार कार्डवरील माहिती आणि त्याचा फोन नंबर लिहिलेली एक चिठ्ठी तिथे पडली होती, असंही सांगितलं जातंय.
सरपंच साथीदारांसोबत आला होता
सेवानिवृत्त कॅप्टन राम सिंह यांचा मुलगा रामलालने सांगितलं की, सरपंचाने आपल्या इतर साथीदारांसोबत मिळून त्यांच्या वडिलांची हत्या केली. मुलाने पुढे सांगितलं की, त्यांनी आरोपी सरपंचाला निवडणुकीत मत दिलं नव्हतं आणि याच कारणामुळे सरपंच त्यांच्यावर खूप रागावला होता आणि यापूर्वीही त्याने त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती.
नांगल चौधरी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक हरीश कुमार यांनी सांगितलं की, मुलौडी गावात एका भांडण आणि मारहाणीची तक्रार आम्हाला मिळाली होती. राम सिंह यांचा मुलगा रामलाल याने या प्रकरणी सविस्तर तक्रार दाखल केली असून, आम्ही संबंधित कलमांखाली गुन्हा नोंदवून घेतला आहे. या प्रकरणातील सर्व आरोपींना लवकरच शोधून अटक केली जाईल.
हे ही वाचा : थकवा, सांधेदुखी, अशक्तपणा? जंगलातील 'हे' छोटंसं झाड अत्यंत उपयोगी; शरीर करतं लोखंडासारखं मजबूत
हे ही वाचा : ना हेलिकाॅप्टर, ना बैलगाडी... नवरदेवाने चक्क 16 चाकी ट्रकमधून घरी नेलं नवरीला; जे ठरवलं ते पूर्ण केलं