या हत्येची माहिती मिळताच चिडावा पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी परिस्थितीची पाहणी केली. मृतदेहाचं पोस्टमॉर्टम (शवविच्छेदन) करून तो नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. हत्येमागचं नेमकं कारण अजूनही पोलिसांना समजलेलं नाहीये. या प्रकरणात निष्काळजीपणा दाखवल्याबद्दल एसपींनी चिडावा पोलीस ठाण्याचे ड्युटी ऑफिसर ASI ओमप्रकाश यांना निलंबित करून पोलीस लाईनमध्ये पाठवलं आहे.
मध्यरात्री घडली घटना
advertisement
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही हत्या रविवारी मध्यरात्री चिडावा शहराच्या वॉर्ड क्रमांक 17 मधील अर्दवतिया कॉलनीमध्ये घडली. हत्या झालेले दिलीप वर्मा (वय-52) हे त्यांच्या घरातच शिलाईचं (टेलरिंगचं) काम करत असत. रात्री 1 ते 1.30 च्या सुमारास ते घरात रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आढळले. मृतकाच्या घरच्यांनी सांगितलं की, रात्री दिलीप वर्मा यांची पत्नी तारामणी आणि धाकटा मुलगा ऋषिकेश हे एका खोलीत झोपले होते. याच वेळी कुणीतरी त्यांच्या खोलीचा दरवाजा वारंवार वाजवला. तारामणी जाग्या झाल्यावर त्यांनी पाहिलं तर त्यांच्या खोलीचा दरवाजा बाहेरून बंद केलेला होता.
कशी समोर आली घटना?
यावर तारामणी यांनी मुलगा ऋषिकेशला उठवलं. ऋषिकेशने त्याचे काका मदन यांना फोन करून सांगितलं की, त्यांच्या खोलीचा दरवाजा कुणीतरी बाहेरून लावून घेतला आहे. यानंतर ऋषिकेशचे काका मदन आणि काकू तातडीने तिथे आले. त्यांनी पाहिलं तर घराचं मुख्य गेट उघडंच होतं. घरात आल्यावर त्यांनी तारामणी आणि ऋषिकेशच्या खोलीचा दरवाजा उघडला. त्यानंतर ते दुसऱ्या खोलीत गेले आणि पाहिलं तर दिलीप वर्मा तिथे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले होते. त्यांना तात्काळ चिडावा येथील उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आलं. तिथून त्यांना झुंझुनू येथील शासकीय जिल्हा बीडीके रुग्णालयात रेफर करण्यात आलं.
वाटेतच झाला मृत्यू
दिलीप यांची गंभीर अवस्था पाहता त्यांना पुढील उपचारासाठी जयपूर येथील एसएमएस रुग्णालयात रेफर केलं. पण जयपूरला नेत असतानाच दिलीप वर्मा यांचा वाटेतच मृत्यू झाला. दिलीप वर्मा यांना दोन मुलगे आणि दोन मुली आहेत. एक मुलगी रेखा विवाहित असून दिल्लीत राहते. मोठा मुलगा कपिल 10-15 दिवसांसाठी बहिणीकडे दिल्लीला गेला होता. धाकटी मुलगी प्रियंकाही तिच्या मावशीकडे खेमू की ढाणी येथे गेली होती. आत्तापर्यंत तरी दिलीप वर्मा यांचा कुणाशीही जुना वाद किंवा वैर असल्याचा कोणताही पुरावा पोलिसांना मिळालेला नाहीये.
धाकट्या मुलाचे गंभीर आरोप
मृत दिलीप वर्मा यांचा धाकटा मुलगा ऋषिकेश वर्मा याने या संदर्भात पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला आहे. त्यात त्याने काही गंभीर आरोप केले आहेत. त्याने सांगितलं आहे की, काही काळापूर्वी एका मुलीने त्याच्या मोठ्या भावाला कपिलला एका पॉक्सो (POCSO) प्रकरणात अडकवलं होतं. त्यानंतर त्याचा भाऊ तुरुंगात गेला होता. पुढे कोर्टात त्या मुलीने जबाब दिला की त्याच्या भावाने कोणताही गुन्हा केला नव्हता. यानंतर त्याचा भाऊ महिन्याभरापूर्वीच तुरुंगातून बाहेर आला. याचा राग मनात धरून त्या मुलीची मावशी आणि तिच्या काही ओळखीच्या लोकांनी वडिलांची हत्या केल्याचा आरोप त्याने केला आहे. सध्या पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.
हे ही वाचा : लग्न झालं, नवरी सासरी निघाली, वाटेत टाॅयलेटला उतरली अन् बाॅयफ्रेंडसोबत पसार झाली, नवरा अजूनही...
हे ही वाचा : दाजीसोबत मेहुणीचं जुळलं सूत, पतीला कळताच विष देऊन संपवलं; 2 वर्षे कुणाला लागली नाही भणक; अखेर...