लग्न झालं, नवरी सासरी निघाली, वाटेत टाॅयलेटला उतरली अन् बाॅयफ्रेंडसोबत पसार झाली, नवरा अजूनही...

Last Updated:

लग्न झाल्यावर नवरदेव आपल्या नवरीला घेऊन घरी चालला होता. वाटेत अचानक नवरीने गाडी थांबवायला सांगितली. तिला टाॅयलेटला जायचं होतं असं ती म्हणाली. म्हणून...

Crime News
Crime News
लग्न झाल्यावर नवरदेव आपल्या नवरीला घेऊन घरी चालला होता. वाटेत अचानक नवरीने गाडी थांबवायला सांगितली. तिला टाॅयलेटला जायचं होतं असं ती म्हणाली. म्हणून नवरदेवाने गाडी थांबवली. बराच वेळ होऊनही नवरी परत आली नाही, तेव्हा तो तिला शोधायला गेला. त्यावेळी त्याला समजलं की, नवरी दुसऱ्या कुणासोबत तरी पळून गेली आहे. उत्तर प्रदेशच्या सुलतानपूरमधून ही घटना समोर आली आहे.
नेमकं काय घडलं?
ही घटना मौआईमा चार लेन हायवे जवळ घडली. सुलतानपूरहून लग्नसोहळा आटोपून वऱ्हाडी मंडळी कौशांबीकडे परतत होती. नवरीने लघुशंका करण्याचा बहाणा केला आणि ती गाडीतून उतरली. संधी मिळताच ती तिच्या प्रियकरासोबत पळून गेली. मौआईमा चार लेन हायवेवर वऱ्हाडी मंडळी जवळपास एक तास तिची वाट पाहत थांबली होती. वऱ्हाडी मंडळींनी सांगितलं की, ते गुरुवारी कौशांबीहून सुलतानपूरला लग्नासाठी गेले होते. नवरीचं दुसऱ्या कुणावर तरी प्रेम होतं, त्यामुळे तिची जयमाला आणि सात फेऱ्यांसाठी तयारी नव्हती. पण घरच्यांच्या दबावामुळे ती तयार झाली आणि सगळे विधी पार पडले.
advertisement
नवरीने केला बराच ड्रामा
पाठवणीच्या वेळीसुद्धा नवरीने बराच ड्रामा केला होता. पण समजूत काढल्यानंतर तिला पाठवण्यात आलं. नवरानवरी गाडीतून कौशांबीसाठी निघाले आणि इतर वऱ्हाडींच्या गाड्याही त्यांच्यासोबत येत होत्या. नवरानवरीची गाडी मौआईमा चार लेन हायवेवरील गणेशगंजजवळ पोहोचली, तेव्हा नवरी म्हणाली की, तिला टायलेटला जायचं आहे. यावर नवरदेवाने तिला बाटलीत पाणी दिलं आणि थोड्या अंतरावर असलेल्या झुडपांच्या दिशेने पाठवलं. पण ती एक तास होऊनही परतली नाही.
advertisement
शोधल्यावर सत्य समोर आलं
यानंतर नवरदेव आणि त्याच्या मित्रांनी झुडपांमध्ये तिचा शोध घेतला, पण नवरी तिथे कुठेच नव्हती. जवळ जनावरे चारणाऱ्या गावकऱ्यांना विचारले असता, त्यांनी सांगितलं की, एक नवरी बाईकवरून गेली आहे. ही माहिती फोनवरून सुलतानपूरमध्ये असलेल्या नवरीच्या घरच्यांना देण्यात आली, त्यानंतर त्यांनी त्यांचे फोन बंद केले. काही वऱ्हाडी रामफल इनारी पोलीस ठाण्यात पोहोचले आणि त्यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. पण पोलिसांनी याकडे लक्ष दिलं नाही आणि त्यांना नवरीच्या घरच्यांशी बोलण्यास सांगितलं. यानंतर वऱ्हाडी नवरीशिवायच कौशांबीला परतले.
advertisement
view comments
मराठी बातम्या/क्राइम/
लग्न झालं, नवरी सासरी निघाली, वाटेत टाॅयलेटला उतरली अन् बाॅयफ्रेंडसोबत पसार झाली, नवरा अजूनही...
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement