पतीला डोळे मिटायला लावले, नंतर प्रियकराच्या मदतीने पत्नीने केली निवृत्त अधिकाऱ्याची हत्या, कारण ऐकून चक्रावले पोलीस

Last Updated:

निवृत्त BHEL अधिकारी जॉर्ज यांचा खून त्यांच्या पत्नीने प्रियकर संजय पाठक आणि त्याच्या मित्रासोबत केला. पत्नीने आधी त्यांच्या डोळ्यात डोळेझोप टाकले आणि डोळे बंद करण्यास सांगितले. त्यानंतर...

Retired officer murder
Retired officer murder
एका सेवानिवृत्त BHEL अधिकाऱ्याच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी मोठा खुलासा केला आहे. पोलिसांनी सांगितलं की, पतीची हत्या करण्यापूर्वी पत्नीने त्यांच्या डोळ्यात आय ड्रॉप (eye drops) टाकला आणि त्यांना 10 मिनिटे डोळे मिटून ठेवायला सांगितले. सेवानिवृत्त अधिकाऱ्याने डोळे मिटताच, त्यांची पत्नी, पत्नीचा प्रियकर संजय पाठक आणि प्रियकराचा मित्र खोलीत घुसले आणि मग त्यांनी गळा दाबून त्यांची हत्या केली.
पती सांगायचा की, माझ्या मृत्यूनंतर 5 तासांनी होणार जिवंत
घर, पेन्शन आणि प्रॉपर्टीच्या लालसेतून पत्नीनेच पतीच्या हत्येचा कट रचला होता. पोलिसांनी या तिन्ही आरोपींना अटक केली आहे. मृत जॉर्ज (George) अनेकदा पत्नीला सांगायचे की, एका ज्योतिषाने त्यांना सांगितले आहे की, मृत्यूनंतर 5 तासांनी ते पुन्हा जिवंत होऊ शकतात. हे लक्षात घेऊन आरोपी पत्नीने त्यांचा मृतदेह तब्बल 5 तास खोलीतच ठेवला होता. आरोपी पत्नी बिट्टीने (Bitti) पोलीस चौकशीत हे सर्व सांगितलं.
advertisement
पत्नी म्हणाली, नवरा बाथरूममध्ये पाय घरून पडला अन्...
मिळालेल्या माहितीनुसार, पत्नीने प्रियकराला हत्येसाठी 10 लाख रुपयांची सुपारी दिली होती. मृत जॉर्ज यांचं वय 65 आणि पत्नी बिट्टीचं वय 32 वर्ष होतं, अशीही माहिती मिळाली आहे. पत्नी पतीमुळे खूप त्रस्त होती. पोलिसांनी सुरुवातीच्या चौकशीत पत्नीने सांगितलं होतं की, बाथरुममध्ये पाय घसरून पडल्यामुळे पतीचा मृत्यू झाला. मात्र, पोलीस तपासात हत्येचं धक्कादायक सत्य समोर आलं आहे.
advertisement
मराठी बातम्या/क्राइम/
पतीला डोळे मिटायला लावले, नंतर प्रियकराच्या मदतीने पत्नीने केली निवृत्त अधिकाऱ्याची हत्या, कारण ऐकून चक्रावले पोलीस
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement