Hardik Pandya : हार्दिक भावा मन जिंकलं! मॅच संपताच कॅमेरामनला दिली 'जादू की झप्पी', 13 व्या ओव्हरमध्ये काय घडलं होतं?
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Hardik Pandya Met Cameraman : अहमदाबादमध्ये हार्दिक पांड्याच्या एका शॉटवर कॅमेरामॅन दुखापतग्रस्त झाला होता. त्यानंतर हार्दिकने मॅचनंतर जाऊन त्या कॅमेरामॅनची भेट घेतली.
Hardik Pandya Apologies Cameraman : अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यातील 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेतील शेवटचा आणि निर्णायक सामना 19 डिसेंबर रोजी पार पडला. या सामन्यात भारताने 30 धावांनी विजय मिळवत मालिका 3-1 ने खिशात टाकली आहे. हार्दिक पांड्याच्या 63 धावांच्या आक्रमक खेळीच्या जोरावर टीम इंडियाने धमाकेदार विजय मिळवला. मात्र, सामना झाल्यानंतर हार्दिक पांड्याने कॅमेरामॅनची भेट घेतली अन् त्याची माफी मागितली आहे.
नेमकं काय घडलं?
कर्णधार सूर्यकुमार यादव बाद झाल्यानंतर 13 व्या ओव्हरमध्ये हार्दिक फलंदाजीला आला. आत येताच पांड्याने पुढे सरसावला आणि कॉर्बिन बॉशच्या बॉलवर एक पावरफुल शॉट मारला आणि सिक्स मारून आपलं खातं घडलं. कॉर्बिन बॉशने ऑफ-स्टंपच्या बाहेर एक लेंथ डिलिव्हरी टाकली, जी हार्दिकने पुढे उडी मारली आणि लाँग-ऑफवर पाठवली. बॉल गोळीच्या स्पीडने आला अन् भारतीय संघाच्या डगआउटजवळ लाँग-ऑफ बाउंड्रीवर उभ्या असलेल्या कॅमेरामॅनला लागला. त्यावेळी नॉन स्ट्राईकवर असलेल्या तिलक वर्माने हार्दिकला कॅमेरामॅनला बॉल लागल्याचं सांगितलं. मात्र, पांड्याने थेट इन्गोर केलं.
advertisement
पाहा Video
- Hardik Pandya smashed the six
- Ball hit the hard to cameraman
- After the innings, Hardik instantly came to meet him
- Hardik hugged the cameraman
Just look at the cameraman's reaction at the end; it's so priceless. This small gesture from cricketers can make someone's day… pic.twitter.com/stV156Og6K
— Tejash (@Tejashyyyyy) December 19, 2025
advertisement
He is so humble pic.twitter.com/iKEYANGw6R https://t.co/rhqcod1cR6
— Suprvirat (@Mostlykohli) December 19, 2025
कॅमेरामॅनची भेट घेतली
पांड्याने आक्रमक खेळी करत तगडा स्कोर उभा केला. मात्र, सामना झाल्यानंतर मात्र पांड्याचं मन विरघळलं. पांड्याने मॅच संपल्यानंतर कॅमेरामॅनची भेट घेतली अन् कुठं लागलंय याची विचारपूस केली. पांड्याने त्यांना काळजी घेण्यास सांगितलं अन् जादू की झप्पी दिली. पांड्याच्या हा मायाळू स्वभाव पाहून कॅमेरामॅन देखील भावूक झाला. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
advertisement
पांड्याची ऑलराऊंडर कामगिरी
दरम्यान, आगामी टी-ट्वेंटी वर्ल्ड कपसाठी हार्दिक पांड्याचा हा फॉर्म टीम इंडियासाठी उत्तम ठरू शकतो. अखेरीस येत आक्रमक फलंदाजी करत स्कोरबोर्ड पळवल्यासाठी हार्दिक पांड्याची बॅटिंग टीम इंडियासाठी कामी येऊ शकते. अशातच पांड्याच्या बॉलिंगने देखील सर्वांना चकित केलं होतं.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Dec 20, 2025 7:31 AM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Hardik Pandya : हार्दिक भावा मन जिंकलं! मॅच संपताच कॅमेरामनला दिली 'जादू की झप्पी', 13 व्या ओव्हरमध्ये काय घडलं होतं?









