सविस्तर वृत्त असं की, राजारामुरीत पहिल्या गल्लीत डाॅ. दत्तात्रय शितोळे यांचे हाॅस्पिटल आहे. त्यांचा मुलगा डाॅ. महेश्वर शितोळे (वय-35) त्या हाॅस्पिटलमध्ये मदत करतो. पत्नी अक्षरा यादेखील डाॅक्टर आहेत. त्या इस्लामपूर येथे मेडिकल काॅलेजमध्ये प्राध्यापिका आहेत. डाॅ. महेश्वर यांचा वारणानगर येथे दयमंती हाॅस्पिटल चालवतात. 9 ऑगस्ट रोजी सायंकाळी 4 वाजता वारणानगरच्या हाॅस्पिटलमध्ये जात असताना डाॅ. महेश्वर यांना एक फोन आला.
advertisement
...अशी घडवून आणली फसवणूक
"मी मुंबई कुलाबा येथून बोलत आहे. तुमच्या मोबाईल नंबरचा वापर करून एका भामट्याने मुंबईत तुमच्या नावाने आधार कार्ड आणि बँक पासबुक काढले आहे. त्याचा वापरा अतिरेकी संघटनांना पैसे पाठवण्यासाठी करण्यात आला आहे. भविष्यात तुम्हाला खूप अडचणी येणार आहेत. मी तुम्हाला या प्रकरणात मदत करू शकतो. पोलिसांना सांगून तुमचा नंबर ब्लाॅक करू शकतो", असा संवाद तोयया पोलीस निरीक्षक राॅय याने सांगितले. त्यानंतर डाॅ. महेश्वरवर यांना या राॅयने थेट व्हाॅट्सअप व्हिडीओ काॅल केला. त्यात पोलीस वर्दीत स्वतःला दाखवले. त्यानंतर बँक खात्याचे डिटेल्स घेतले. डाॅ. महेश्वर यांच्याकडून पहिल्यांदा 26 हजार, नंतर 30 हजार ऑनलाईन घेतले. 'तुमचे पैसे सुरक्षित आहे, ते चौकशीनंतर परत मिळतील', असे पैसे घेण्यात आले.
पहिल्यांदा मुलाची, नंतर वडिलांची फसवणूक
डाॅ. महेश्वर यांच्यानंतर त्यांच्या वडिलांचा अर्थात डाॅ. दत्तात्रय शितोळा यांचा नंबर घेऊन तोतया पोलीस निरीक्षक राॅयने त्यांनाही काॅल केला. तुमच्या मुलाला अटक होईल, अशी भीती दाखवली आणि 5 लाख 35 हजार रुपयांची रक्कम त्यांच्याकडूनही ऑनलाईन घेण्यात आली. पुढे डाॅ. दत्तात्रय यांनी शेअर्स विक्री करण्यास भाग पाडले आणि सुमारे 37 लाख रुपये आरटीजीएसद्वारे स्वीकारले. इतकंच करून ते तोयता थांबला नाही, तर पुन्हा काॅल करून 40 लाखांची मागणी करत होते.
या सगळ्या प्रकारानंतर डाॅक्टर पिता-पुत्रांच्या फसवणूक होत असल्याचे लक्षात आले. त्यानंतर राजारामपुरी पोलीस ठाण्यात 42 लाख 91 हजारांची फसवणूक झाल्याची फिर्याद दिली. या प्रकरणात पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण आणि त्यांचे सहकारी तपास करत आहेत.
हे ही वाचा : Dating App Scam : 'बुलाती है मगर जाने का नही' तिनं तरुणाला भेटायला बोलावलं आणि... कांड होताच पोलिसात धाव
हे ही वाचा : ब्रेकअप झाल्याचा राग, पुण्यात MBAच्या विद्यार्थिनीवर गोळीबार, डिलिव्हरी बॉय बनून आला अन्...