ब्रेकअप झाल्याचा राग, पुण्यात MBAच्या विद्यार्थिनीवर गोळीबार, डिलिव्हरी बॉय बनून आला अन्...
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
Crime in Pune: पुण्यातील बाणेर परिसरात एक थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. इथं एका खासगी कंपनीच्या आवारात एमबीएचं शिक्षण घेणाऱ्या तरुणीवर गोळीबार करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
पुणे: पुण्यातील बाणेर परिसरात एक थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. इथं एका खासगी कंपनीच्या आवारात एमबीएचं शिक्षण घेणाऱ्या तरुणीवर गोळीबार करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. हा गोळीबार दुसरा तिसरा कुणी नव्हे तर त्या तरुणीच्या बॉयफ्रेंडनेच केल्याची माहिती समोर आली आहे. आरोपीनं डिलीव्हर बॉयच्या वेशात येऊन तरुणीला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला. मात्र पीडित तरुणी थोडक्यात बचावली. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना प्रेमसंबंधातून घडल्याची माहिती समोर आली आहे. आरोपी तरुण आणि पीडित तरुणी हे एकामेकांना ओळखतात. दोघंही काही काळापासून प्रेमसंबंधात होते. मात्र अलीकडेच दोघांचा ब्रेक अप झाला होता. याच रागातून तरुणाने हत्या करण्याच्या उद्देशाने तरुणीच्या दिशेनं गोळीबार केला. मात्र या हल्ल्यात तरुणी थोडक्यात बचावली आहे. आरोपीनं ज्यावेळी गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी बंदुकीतून गोळीच सुटली नाही. यामुळे मोठा अनर्थ टाळला.
advertisement
ही घटना शुक्रवारी (29 ऑगस्ट, 2025) बाणेर येथील एका खासगी कंपनीच्या आवारात घडली. पीडित २४ वर्षीय तरुणी एमबीए करत असून ती संबंधित कंपनीत प्रशिक्षण घेत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी शुक्रवारी नेहमीप्रमाणे कंपनीत गेली होती. यावेळी आरोपी तरुणाने तिला कंपनीच्या आवारात अडवले. आरोपीने डिलिव्हरी बॉयचा वेश परिधान केला होता आणि त्याने तोंडाला मास्कही लावला होता.
advertisement
त्याने तरुणीसोबत बोलण्याचा प्रयत्न केला, मात्र तिने बोलण्यास नकार दिला. याच रागातून आरोपीने आपल्याकडील पिस्तूल काढून तिच्या दिशेने गोळ्या झाडण्याचा प्रयत्न केला. परंतु, पिस्तुलातून गोळी न सुटल्याने मोठा अनर्थ टळला. या घटनेनंतर परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Aug 30, 2025 6:58 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
ब्रेकअप झाल्याचा राग, पुण्यात MBAच्या विद्यार्थिनीवर गोळीबार, डिलिव्हरी बॉय बनून आला अन्...









