TRENDING:

चाळीसगाव हादरलं! चारित्र्याच्या संशयातून भयानक कांड, आधी पत्नीची हत्या नंतर पतीनं उचललं टोकाचं पाऊल

Last Updated:

दुहेरी मृत्यूमुळे गावात मोठी खळबळ उडाली असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
विजय वाघमारे, प्रतिनिधी
News18
News18
advertisement

जळगाव: चाळीसगाव तालुक्यातील हातगाव गावात एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. कौटुंबिक वादातून पतीने पत्नीचा गळा आवळून खून केल्यानंतर स्वतः आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.चारित्र्यावर संशय घ्यायचा याच वादातून हे हत्याकांड घडलं आहे.

विजय सुखदेव चव्हाणके (पती) याने आपल्याच शेतात पत्नी वर्षा विजय चव्हाणके हिचा गळा आवळून खून केल्यानंतर गळफास घेऊन आत्महत्या केली. या दुहेरी मृत्यूमुळे गावात मोठी खळबळ उडाली असून, परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेतले असून रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहे.

advertisement

विजय आणि वर्षा यांच्यामध्ये रात्री कडाक्याचं भांडण

विजय हा आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घ्यायचा, यातूनच ही धक्कादायक घटना घडली आहे. विजयने आधी आपल्या पत्नीचा गळा आवळला या घटनेत वर्षाचा मृत्यू झाला. त्यानंतर त्याने देखील गळफास घेत आपलं आयुष्य संपवलं आहे. या घटनेनं खळबळ उडाली आहे. विजय आणि वर्षा यांच्यामध्ये रात्री कडाक्याचं भांडण झालं.

advertisement

चाळीसगाव तालुक्यात प्रचंड खळबळ

पोलिसांनी प्राथमिक माहितीच्या आधारे चारित्र्याच्या संशयावरून ही घटना घडल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत. दरम्यान या घटनेमुळे चाळीसगाव तालुक्यात प्रचंड खळबळ उडाली आहे.  पत्नीचा खून करून स्वत:ही आत्महत्या केली आहे.  तसेच, आत्महत्या करण्यापूर्वी घटनास्थळी कोणतीही चिठ्ठी मिळून आलेली नाही.

पती पत्नीच्या दुहेरी मृत्यूमुळे हळहळ

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शेतकऱ्यानं धाडस दाखवलं, केली बोरांची शेती, वर्षाला 3 लाखांचं उत्पन्न
सर्व पहा

पती पत्नीच्या दुहेरी मृत्यूमुळे हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेचा तपास पथक करत आहे. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.  या बाबत मृतांच्या नातेवाईकांकडे चौकशी केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलीस तपास करत आहे.

मराठी बातम्या/क्राइम/
चाळीसगाव हादरलं! चारित्र्याच्या संशयातून भयानक कांड, आधी पत्नीची हत्या नंतर पतीनं उचललं टोकाचं पाऊल
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल