मयत अजित यादव यांच्या मालकीचे 'यादव हॉटेल' या नावाचे ढाबा मालजीपाडा येथे आहे. शनिवारी रात्री या हॉटेलमध्ये पूर्वी काम करणारा कर्मचारी लल्ला अमर सिंग आपल्या सहा मित्रांसह मुक्कामासाठी आला होता. मात्र रात्री हॉटेलमधील काही जणांचे मोबाइल गायब झाल्याचे लक्षात आले. या चोरीचा संशय अजित यादव यांनी लल्ला सिंग आणि त्याच्या मित्रांवर व्यक्त केला. त्यावरून दोघांमध्ये जोरदार वाद झाला. रागाच्या भरात यादव यांनी लल्ला सिंगच्या कानशिलात लगावली होती. त्यामुळे लल्ला सिंगला आपला संताप अनावर झाला. मात्र, या वादानंतर तो तिथून निघून गेला.
advertisement
कानशिलात लगावल्याचा राग मनात धरला अन्...
सकाळी झालेल्या या अपमानाचा राग मनात धरून लल्ला सिंग रविवारी संध्याकाळी आपल्या साथीदारांसह पुन्हा हॉटेलवर परतला. त्यांनी अचानक अजित यादव यांच्यावर हल्ला चढवला. लल्ला सिंगने लाकडी दांडक्याने डोक्यावर वार केला, तर शिवम यादव व महेश यादव यांनी खुर्ची फेकून मारली. हल्ल्यात हॉटेलमधील कर्मचारी कपिल यादव यालाही बेदम मारहाण झाली. अजित यादव यांनी जीव वाचवण्यासाठी पळ काढला, पण भोला यादव व राजन मौर्य यांनी त्यांना बाहेर पकडून जमिनीवर आपटले.
आरोपींच्या मुसक्या आवळल्या...
या क्रूर हल्ल्यानंतर सर्व आरोपी फरार झाले. गंभीर जखमी अवस्थेत अजित यादव व कपिल यादव यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान सोमवारी सकाळी अजित यादव यांचा मृत्यू झाला. नायगाव पोलीस ठाण्यात या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून सातही आरोपींना अटक केल्याची माहिती पोलीस निरीक्षकांनी दिली. या प्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
