TRENDING:

लग्न झाल्यावरही प्रियकराशी होते अनैतिक संबंध, नवऱ्यासोबत केलं भयानक कांड

Last Updated:

जलचे (रा. नारायपूर) लग्न चांदपुरा येथील रहिवासी असलेल्या कुणाल सिंह याच्यासोबत झाले होते. मात्र, काजलचे आधीपासूनच धीरज सिंहसोबत प्रेमसंबंध होते.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
संतोष कुमार गुप्ता, प्रतिनिधी
मृताचे नातेवाईक
मृताचे नातेवाईक
advertisement

छपरा, 30 जुलै : देशात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचे दिसत आहे. अनैतिक संबंधातून खून, आत्महत्या, तसेच बलात्काराच्याही घटना समोर येत आहेत. त्यातच आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बिहार राज्यातील सारणमधील अमनौर येथे भरदिवसा एका बँक कर्मचाऱ्याची हत्या करण्यात आली होती. कुणाल सिंह असे मृताचे नाव होते. या हत्याकांडानंतर आता मोठा खुलासा झाला आहे.

advertisement

ही हत्या प्रेमप्रकरणातून करण्यात आली असे समोर आले आहे. मृत कुणाल सिंह यांची पत्नीचा यामध्ये सहभाग होता. शूटरच्या मदतीने ही हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी खुलासा करताना पोलिसांनी 2 जणांना अटक केली आहे. तर शूटरचा शोध पोलीस घेत आहेत. पोलीस अधीक्षक गौरव मंगला यांनी सांगितले की, या हत्या प्रकरणात कुणालची पत्नी काजल कुणारी हिचा सहभाग असल्याचे समोर आले आहे.

advertisement

पोलीस अधीक्षक गौरव मंगला पुढे म्हणाले की, काजलचे (रा. नारायपूर) लग्न चांदपुरा येथील रहिवासी असलेल्या कुणाल सिंह याच्यासोबत झाले होते. मात्र, काजलचे आधीपासूनच नारायणपूर येथील रहिवासी असलेल्या धीरज सिंहसोबत प्रेमसंबंध होते. दोन्ही सतत एकमेकांच्या संपर्कात होते. लग्नाच्या अनेक महिन्यांनतर कुणाल सिंह आणि काजलला एक यांना एक मुलही झाले. मात्र, तरीसुद्धा काजल आणि धीरज सिंह यांच्यामध्ये अनैतिक संबंध सुरू होते. यामुळे काजलच्या सांगण्यावरुन धीरजने आपल्या प्रेयसीचा पती कुणाल याच्या हत्येचा कट रचला.

advertisement

या कटात त्यांनी फिरोजपुर गावाचा रहिवासी असलेला ओमप्रकाश सिंह उर्फ लिलुआ या शूटरची मदत घेतली. अनेक दिवस लिलुआ याने कुणालचा पाठलाग केला. आरा परिसराजवळ कुणालची हत्या केली जावी, अशी त्यांची योजना होती. मात्र, त्यांना यामध्ये यश मिळाले नाही आणि अमनौरच्या अपहरजवळ लिलुआने कुणाल सिंह याची गोळी झाडून हत्या केली.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
गजाआडही खुलली कला! कैद्यांनी कारागृहात बसून काढली चित्रं, इथं भरलंय प्रदर्शन
सर्व पहा

एसपी गौरव मंगला यांनी पुढे सांगितले की, पोलिसांनी याप्रकरणी तपास करताना सीसीटीव्ही फुटेज मिळाले होते. यामध्ये एक संशयित कुणालचा पाठलाग करताना दिसत होता. दरम्यान, कुणालच्या पत्नीचेही कॉल डिटेल्स चेक करण्यात आले. यानंतर पोलिसांना तिच्यावर संशय आला असता तिची कसून चौकशी केल्यानंतर घटनेचा खुलासा झाला. याप्रकरणी 2 जणांना अटक करण्यात आली असून शूटरला अटक करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

advertisement

मराठी बातम्या/क्राइम/
लग्न झाल्यावरही प्रियकराशी होते अनैतिक संबंध, नवऱ्यासोबत केलं भयानक कांड
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल