एफएसएल रिपोर्टमधून सत्य उघड
देवासगेटचे टीआय अनिला पराशर यांनी सांगितलं की, 13 डिसेंबर 2023 रोजी रात्री नऊ वाजता धर्मादाय रुग्णालयातून माहिती मिळाली की संजय मालवीय यांचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला आहे. डॉक्टरांना विषबाधा झाल्याचा संशय होता. तर संजयची पत्नी आणि नातेवाईक सांगत होते की, त्यांची तब्येत अचानक बिघडली. जेव्हा या प्रकरणाची चौकशी केली, तेव्हा असं आढळलं की त्याची पत्नी आणि नातेवाईकांनी संजयला आधी सरकारी रुग्णालयात नेलं होतं, पण त्यांची गंभीर अवस्था पाहून कोणालाही न सांगता त्याला धर्मादाय रुग्णालयात दाखल केलं. जेव्हा पीएम (पोस्ट मॉर्टम) आणि एफएसएलचा रिपोर्ट आला, तेव्हा त्यांच्या शरीरात सल्फास नावाचं विषारी रसायन आढळलं.
advertisement
आणि मग गुन्ह्याची कबुली
एफएसएल रिपोर्ट आल्यानंतर पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. रिपोर्टमध्ये सल्फास असल्याची खात्री झाल्यावर पोलिसांनी मृत संजयच्या पत्नीची कसून चौकशी केली. अखेर तिने आपला गुन्हा कबूल केला. तिने सांगितलं की, तिचे दाजी अंकितसोबत अनैतिक संबंध होते. संजयला याची माहिती मिळाली होती. दोघांमध्ये अनेकदा भांडणं झाली होती. इतकंच नाही, तर संजयने दोघांना अनेकवेळा आक्षेपार्ह अवस्थेत पकडलं होतं. याच कारणामुळे पत्नीने दाजी अंकित परमार, कल्पना, हरिनारायण मालवीय, फुंडा बाई, मीना आणि एका अल्पवयीन मुलीसोबत मिळून संजयला विष देऊन मारण्याचा कट रचला. पोलिसांनी आता मृत संजयच्या पत्नीसह 7 आरोपींना अटक केली आहे.
हे ही वाचा : सातव्या फेरीला नवऱ्याचा लग्नास नकार, 56 लाख खर्चूनही मोडलं लग्न, पण का? वाचा सविस्तर
हे ही वाचा : पतीला डोळे मिटायला लावले, नंतर प्रियकराच्या मदतीने पत्नीने केली निवृत्त अधिकाऱ्याची हत्या, कारण ऐकून चक्रावले पोलीस