विनोद विजय जाधव (वय-26) असे आरोपी पतीचे नाव असून, त्याच्या हल्ल्यात पिंकी विनोद जाधव (वय-21) या पत्नीचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी दुपारी एकच्या सुमारास विनोद जाधव स्वतःहून पोलीस ठाण्यात आला. "मी पत्नीचा चारित्र्याच्या संशयावरून लोखंडी गजाने खून केला आहे, तिचा मृतदेह घरात रक्ताच्या थारोळ्यात पडला आहे," असे त्याने पोलिसांना सांगितले.
advertisement
घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक संदीप पोमण तातडीने घटनास्थळी पोहोचले. त्यांना पिंकी जाधव रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली. नातेवाईकांच्या मदतीने पोलिसांनी तिला पुसेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले, पण डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
पिंकीला तीन लहान मुले आहेत. या हृदयद्रावक घटनेमुळे कटगुणसह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. आरोपी पती विनोद जाधव याच्याविरुद्ध पुसेगाव पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.
हे ही वाचा : Beed Crime : 'बायकोला नांदायला का पाठवत नाहीस', जावयाला आला राग, मेहुण्याचं हॉटेलच पेटवून दिलं!
हे ही वाचा : अल्पवयीन मुलीचं जबरदस्तीने लग्न, पण आईचंच जावयासोबत... बीडमध्ये 4 वर्षांपूर्वी नेमकं काय घडलं?