आंध्र प्रदेशातील गुंटूर जिल्ह्यातून माणुसकीला काळिमा फासणारी आणि क्रूरतेच्या सर्व सीमा ओलांडणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका पत्नीने आपल्या पतीचा केवळ काटाच काढला नाही, तर हत्येनंतर तिने जे काही केलं, ते ऐकून पोलिसांच्याही अंगावर शहारे आले आहेत.
पतीची हत्या करून पत्नी रात्रभर मृतदेहाशेजारी बसून पाहत होती 'अश्लील व्हिडिओ'; थरार ऐकून तुम्हीही सुन्न व्हाल
advertisement
आंध्र प्रदेशातील चिलुवुरु गावात घडलेल्या या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. अनैतिक संबंधांतून एका महिलेने आपल्या प्रियकराच्या मदतीने पोटच्या गोळ्यासारख्या जपलेल्या संसाराची राखरांगोळी केली.
मृत लोकम शिव नागराजू हे व्यवसायाने कांद्याचे व्यापारी होते. त्यांची पत्नी लक्ष्मी माधुरी हिचे गोपी नावाच्या तरुणासोबत अनैतिक संबंध होते. या प्रेमप्रकरणात पती अडसर ठरत असल्याने माधुरीने त्याच्या हत्येचा कट रचला. घटनेच्या रात्री तिने पतीसाठी आवडीची बिर्याणी बनवली. मात्र, या बिर्याणीत तिने आधीच गुंगीचे औषध मिसळले होते. बिर्याणी खाल्यानंतर काही वेळातच नागराजू गाढ झोपेत गेले.
रात्री साडेअकराच्या सुमारास माधुरीचा प्रियकर गोपी याने घरात प्रवेश केला. नागराजू गाढ झोपेत असताना गोपी त्यांच्या छातीवर बसला आणि त्याने त्यांना घट्ट पकडून ठेवले. त्याच वेळी माधुरीने उशीने पतीचे तोंड दाबून धरले. श्वास कोंडल्यामुळे नागराजू यांचा जागीच मृत्यू झाला.
हत्या केल्यानंतर प्रियकर गोपी तिथून पसार झाला, पण माधुरी तिथेच थांबली. सर्वसामान्यपणे अशी गुन्हेगार व्यक्ती घाबरून जाते किंवा पळ काढते, पण माधुरीने जे केले ते थक्क करणारे होते. आपल्या पतीचा मृतदेह समोर पडलेला असताना, ती रात्रभर त्याच्या शेजारी बसून आपल्या मोबाईलवर अश्लील व्हिडिओ पाहत होती. पहाटे 4 वाजेपर्यंत तिने हा विकृत प्रकार सुरू ठेवला.
सकाळी 4 वाजता माधुरीने आरडाओरडा करून शेजाऱ्यांना जमा केले आणि आपल्या पतीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचा बनाव रचला. मात्र, शेजाऱ्यांना या दाम्पत्यातील वाद आणि माधुरीच्या वागण्याबद्दल आधीच संशय होता. त्यांनी तातडीने पोलिसांना पाचारण केले.
पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. रिपोर्टमध्ये नागराजू यांचा मृत्यू गुदमरून झाल्याचे आणि त्यांच्या छातीच्या बरगड्या तुटल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी जेव्हा माधुरीची कडक भाषेत चौकशी केली, तेव्हा तिने आपला गुन्हा कबूल केला. तिने हत्येची पूर्ण कबुली दिलीच, पण मृतदेहाजवळ बसून अश्लील व्हिडिओ पाहिल्याची गोष्टही मान्य केली.
ही घटना केवळ एक गुन्हेगारी कृत्य नाही, तर ती मानवी मानसिकतेच्या विकृतीचे दर्शन घडवणारी आहे. अनैतिक संबंधांची नशा माणसाला किती खाली पाडू शकते, याचे हे ज्वलंत उदाहरण आहे. पोलिसांनी माधुरीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.
