TRENDING:

OTT Movie: 2 तास 31 मिनिटांचा सिनेमा, थिएटरमध्ये फ्लॉप पण OTT वर धमाका! स्वप्न आणि वास्तवमध्ये गुंतली कहाणी

Last Updated:

OTT Movie: सिनेमांच्या लाटेत एक असा चित्रपट जो थिएटरमध्ये फ्लॉप झाला. मात्र आता ओटीटीवर खळबळ उडवतोय. ज्याने प्रेक्षकांचं हृदय जिंकलं आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : सिनेमांच्या लाटेत एक असा चित्रपट जो थिएटरमध्ये फ्लॉप झाला. मात्र आता ओटीटीवर खळबळ उडवतोय. ज्याने प्रेक्षकांचं हृदय जिंकलं आहे. थिएटरमध्ये रिलीज झाल्यावर जास्त गाजावाजा न झालेला हा सिनेमा आता नेटफ्लिक्सवर जणू आग लावतोय.
 थिएटरमध्ये फ्लॉप पण OTT वर धमाका!
थिएटरमध्ये फ्लॉप पण OTT वर धमाका!
advertisement

दक्षिणेतील सुपरस्टार फहाद फासिल आणि अभिनेत्री कल्याणी प्रियदर्शन यांचा नवा चित्रपट ‘ओदुम कुथिरा चदुम कुथिरा’ सध्या नेटफ्लिक्सवर तुफान ट्रेंड होत आहे. थिएटरमध्ये फारशी गाजावाजा न झालेला हा चित्रपट OTT वर मात्र जबरदस्त प्रतिसाद मिळवत आहे. प्रेक्षक या चित्रपटातील रोमॅन्स, ड्रामा आणि ब्लॅक कॉमेडीच्या अनोख्या मिश्रणावर फिदा झाले आहेत.

2 तास 26 मिनिटांच्या सिनेमाचा धुमाकूळ, OTT वर येताच क्राइम थ्रिलर ट्रेंडिंग!

advertisement

फहाद फासिल आणि कल्याणी प्रियदर्शन यांच्या केमिस्ट्रीने प्रेक्षकांना खिळवून ठेवलं आहे. रोमॅन्स, ड्रामा आणि ब्लॅक कॉमेडीचा अनोखा तडका ‘ओदुम कुथिरा चदुम कुथिरा’ हा चित्रपट प्रेक्षकांना स्वप्नं, प्रेम आणि वास्तव यांच्या भूलभुलैय्यात घेऊन जातो. दृश्य सौंदर्य, भावनिक कथा आणि फहादच्या अभिनयाचा जादू या तिन्हींच्या मिश्रणामुळे हा सिनेमा सध्या OTT वर सर्वाधिक चर्चेत आहे.

advertisement

या चित्रपटात फहाद फासिलने एबी मॅथ्यू नावाच्या तरुणाची भूमिका साकारली आहे, तर कल्याणी प्रियदर्शन त्याची मंगेतर निधी बनली आहे. लग्नाच्या आधी निधीला पडलेले एक स्वप्न "एबी पांढऱ्या घोड्यावर बसून मिरवणुकीत येतो"  हीच संपूर्ण कथानकाची सुरुवात ठरते. एबी खरोखरच पांढऱ्या घोड्यावर बसून येतो, पण लग्नाच्या दिवशी झालेल्या अपघातामुळे तो कोमात जातो. जवळपास एक वर्षानंतर जेव्हा तो शुद्धीवर येतो, तेव्हा निधी त्याला सोडून गेली असते.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शेतकऱ्यांसाठी चिंताजनक बातमी, नवीन सोयाबीनचे दर घसरलेलेच, आज काय मिळाला भाव?
सर्व पहा

दुःखातून सावरण्यासाठी एबी बंगळुरूला जातो, जिथे त्याला रेवती नावाची मुलगी भेटते. ती स्वतःच्या भूतकाळामुळे नैराश्यात असते. एबी तिच्या आयुष्यात सकारात्मकता आणतो, आणि दोघांमध्ये एक अनोखा बंध तयार होतो. एबीचे मन अजूनही निधीकडे असते. जेव्हा तो पुन्हा निधीला भेटतो, तेव्हा तो तिला आपल्या कोमात असताना पडलेल्या स्वप्नांबद्दल सांगतो. त्या क्षणानंतर त्यांचे नाते नव्याने जुळते आणि कथा एक सुंदर शेवटाकडे जाते.

advertisement

मराठी बातम्या/मनोरंजन/
OTT Movie: 2 तास 31 मिनिटांचा सिनेमा, थिएटरमध्ये फ्लॉप पण OTT वर धमाका! स्वप्न आणि वास्तवमध्ये गुंतली कहाणी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल