१५० कोटींचा टप्पा पार; यंदाचा पहिला सुपरहिट
१२ जानेवारीला रिलीज झालेल्या या ॲक्शन-कॉमेडी चित्रपटाने पहिल्या दिवसापासूनच थिएटरमध्ये प्रेक्षकांची गर्दी खेचली आहे. ३२.२५ कोटींच्या बंपर ओपनिंगनंतर या चित्रपटाची घोडदौड थांबण्याचं नाव घेत नाहीये. ताज्या आकडेवारीनुसार, भारतामध्ये या चित्रपटाने ११६.१७ कोटींचा टप्पा ओलांडला असून, जगभरातील कमाईचा आकडा १५० कोटींच्या पार गेला आहे. २०२६ सालातील भारतीय सिनेसृष्टीतील हा पहिला ब्लॉकबस्टर ठरला आहे.
advertisement
प्रभासच्या 'राजा साब'चे धाबे दणाणले
एकीकडे प्रभासचा 'द राजा साब' १९१ कोटींच्या कमाईवर स्थिर असताना, चिरंजीवीच्या चित्रपटाने त्याला जबरदस्त वेगात मागे टाकायला सुरुवात केली आहे. 'राजा साब'चे कलेक्शन हळूहळू कमी होत आहे, तर 'माना शंकरा वरप्रसाद गारू'चे शो अजूनही हाऊसफुल्ल जात आहेत. येत्या वीकेंडपर्यंत चिरंजीवी प्रभासच्या सिनेमाला ओव्हरटेक करेल, अशी दाट शक्यता ट्रेड ॲनलिस्ट वर्तवत आहेत.
कोणी विचारही केला नसेल! तन्वी-सोनालीला पछाडून 'या' स्पर्धकाने मारली बाजी, ठरली 'बिग बॉस मराठी 6'ची पहिली कॅप्टन!
नयनतारा अन् व्यंकटेशची साथ; चिरंजीवीचा विंटेज स्वॅग
अनिल रविपुडी यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात चिरंजीवीचा तोच जुना, विंटेज स्टाईल ॲक्शन आणि कॉमेडी पाहायला मिळत आहे. या सिनेमात चिरंजीवीसोबत साऊथची लेडी सुपरस्टार नयनतारा मुख्य भूमिकेत आहे. मात्र, प्रेक्षकांसाठी सर्वात मोठं सरप्राईज ठरलंय ते म्हणजे दग्गुबाती व्यंकटेशचा जबरदस्त कॅमिओ! या तिघांच्या केमिस्ट्रीने पडद्यावर जो धिंगाणा घातलाय, त्याला प्रेक्षक शिट्ट्या आणि टाळ्यांनी दाद देत आहेत.
