TRENDING:

Marathi Serial : येत्या सोमवारपासून नाही पाहायला मिळणार या दोन मालिका, पण कारण काय?

Last Updated:

Marathi Serial : मराठी टेलिव्हिजनवरील दोन मालिका सोमवार पासून प्रेक्षकांना पाहायला मिळणार नाहीत. कोणत्या आहेत त्या मालिका? आणि का पाहायला मिळणार नाहीत? पाहूयात.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
News18
News18
advertisement

मुंबई : मालिका आणि प्रेक्षकांचं एक वेगळं नातं आहे. दिवस कितीही बिझी असला तरी वेळात वेळ काढून मालिका या पाहिल्याच जातात. घरातील गृहिणी असोत, वर्किंग महिलो असोत किंवा पुरूष असोत मालिका या आवर्जून पाहिल्या जातात. मराठी मालिका विश्वात येत्या सोमवार पासून महत्त्वाचा बदल होणार आहे. मराठी टेलिव्हिजनवरील दोन मालिका सोमवार पासून प्रेक्षकांना पाहायला मिळणार नाहीत. कोणत्या आहेत त्या मालिका? आणि का पाहायला मिळणार नाहीत? पाहूयात.

advertisement

मराठी टेलिव्हिजनवर सध्या अनेक विषयाच्या मालिका सध्या सुरू आहेत. अनेक जुन्या मालिकांनी प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. तर काही नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. नव्या मालिकांसाठी प्रेक्षकांनीही उत्सुकता दाखवली आहे. नव्या मालिकेत नवे कलाकार, नवी कथा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

( पूर्णाआजीच्या रोलसाठी कोणाची एन्ट्री होणार आणि कधी? जुई गडकरीने दिली महत्त्वाची अपडेट )

advertisement

सध्या स्टार प्रवाह वाहिनीवरील सगळ्याच मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत. पण येत्या सोमवार पासून स्टार प्रवाहवरील दोन मालिका प्रेक्षकांना पाहायला मिळणार नाहीत. कारण या मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत आहेत.

प्रवाह दुपारमध्ये लागणारी 'आई आणि बाबा रिटायर होत आहेत' या मालिकेनं प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. ही मालिका सोमवार ते शनिवार दुपारी 2 वाजता टेलिकास्ट होत होती. त्याचबरोबर शिवानी सुर्वेची 'थोडं तुझं थोडं माझं' ही मालिकाही संपणार आहे. ही मालिका सोमवार ते शुक्रवार रात्री 9 वाजता टेलिकास्ट होत होती.

advertisement

हे आहे कारण

स्टार प्रवाहवर दोन नव्या मालिका सुरू होत असल्याने या दोन मालिका सोमवारपासून प्रेक्षकांना पाहायला मिळणार नाहीत. 'आई आणि बाबा रिटायर होत आहेत' या मालिकेच्या जागी रुपाली भोसलेची 'लपंडाव' ही मालिका टेलिकास्ट होणार आहे. 

तर 'थोडं तुझं थोडं माझं' या मालिकेच्या जागी 'नशीबवान' ही मालिका 15 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे.

मराठी बातम्या/मनोरंजन/
Marathi Serial : येत्या सोमवारपासून नाही पाहायला मिळणार या दोन मालिका, पण कारण काय?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल