आजवर आपण पाहिलं असेल की अनेक बॉलिवूड आणि साऊथच्या कलाकारांची फॅन फॉलोविंग पाहिली असेल. जिथे जाऊ तिथे त्यांचे फॅन्स त्यांना भेटत असतात. अनेकदा फ्लाइट्समध्ये हवाई सुंदरी त्यांच्याशी बोलतात. मध्यंतरी क्रिकेटर धोनी झोपलेला असताना त्याच्या हवाई सुंदरी फॅननं त्याच्याबरोबर गुपचूप फोटो काढत फॅन मुमेंट शेअर केली होती. त्याचप्रमाणे आता मराठी कलाकारांनाही सगळे ओळखू लागले आहेत. अभिनेत्री रूपाली भोसले ही त्यांच्यापैकीच एक अभिनेत्री ठरली आहे.
advertisement
हेही वाचा - Prajakta Mali : ओशो भक्त असलेली प्राजक्ता माळी करणार खास गोष्ट, म्हणाली आज सुरूवात...
अभिनेत्री रूपाली भोसले काही कामानिमित्त विमान प्रवास करताना तिथली हवाई सुंदरी तिची खूप मोठी फॅन असल्याचं तिला कळलं. हवाई सुंदरीनं रुपालीचं खूप कौतुक केलं. तिच्याबरोबर फोटो काढले आणि तिच्यासाठी एक प्रेमाचं लेटर देखील लिहिलं. हे सगळं पाहून रूपाली फार भारावून गेली. तिनं त्या हवाई सुंदरीबरोबरचे फोटो आणि तिनं लिहिलेलं लेटर शेअर करत भावना व्यक्त केल्यात.
रुपाली भोसलेनं तिच्या पोस्टमध्ये लिहिलंय, "आजपर्यंत बॉलिवूड सेलिब्रेटींचे असे फोटो किंवा केबिन क्रू त्यांच्याबरोबर फोटो काढतात, त्यांना गिफ्ट्स देतात आणि असे फोटो काढतात. पण आज जेव्हा माझ्याबरोबर हे सगळं घडलं तेव्हा खरंच खूप छान वाटलं. का माहिती नाही पण डोळे पाणावले, थोडी भावूक झाले पण चेहऱ्यावर एक हसू देखील होतं".
"मला आशा आहे की तुला आमच्याबरोबर प्रवास करून छान वाटलं असेल. आई कुठे काय करते मधील संजनाची मी खूप खूप खूप मोठी फॅन आहे. तू स्वत:ला ज्या पद्धतीनं प्रेझेंट करतेस ते मला खूप आवडतं. तुझी स्टाइल देखील मला खूप आवडते. आशा आहे की आपण पुन्हा लवकरच भेटू", असं प्रेमाचं लेटर हवाई सुंदरीनं रुपाली भोसलेसाठी लिहिलं आहे.
