आई कुठे काय करते मालिकेच्या येणाऱ्या भागात गौरी भारतात येणार आहे. भारतात आल्यानंतर की यशला भेटते. यशला भेटल्यानंतर गौरी आत्महत्येचा प्रयत्न करते असं दाखवण्यात आलं आहे. संजना गौरीला भेटण्यासाठी जाते आणि ती जीव देत असल्याचं पाहते. हे सगळं येऊन ती देशमुखांच्या घरी सांगते. यानंतर गौरीला यशला सोडल्याचा पश्चाताप होत आहे असं सर्वानं वाटतं. पण यश मात्र आरोहिशी लग्न करण्याच्या निर्णयावर ठाम असल्याचं सांगतो.
advertisement
यशला निर्णयाला अरुंधती सपोर्ट करते. यश तू आरोहीशीच लग्न कर असं अरुंधती सांगते. अरुंधतीचा हा निर्णय संजनाला मात्र पटत नाही. घरात सर्वांसमोर आणि खास करून आशुतोषसमोर संजना अरुंधतीला खडे बोल सुनावते. या सगळ्याप्रकारानंतर अरुंधतीची काळजी आणखी वाढते. कारण एकीकडे मनु आणि माया टिचरमुळे सगळे काळजीत आहेत. आशुतोष आणि अरुंधती यांच्यात तणाव निर्माण झालेत.
या परिस्थितीमध्ये आशुतोष अरुंधतीची साथ देतो. संजना आज जरी रागात बोलली असली तरी तिनं तुझ्यावर फार गंभीर आरोप केलेत. तुझ्याबद्दल वाईट बोललेलं मी सहन करू शकत नाही. मी ते खपवूनच घेऊ शकत नाही. मी हे सगळं करणारच आहे पण तू टेन्शन घेऊ नकोस. तू फक्त यशला सांभाळ, असं आशुतोष अरुंधतीला सांगतो.
देशमुखांच्या घरी मात्र संजनाचा पारा चांगलाच चढलेला असतो. संजना आप्पांना सांगते, "अरुंधतीनेच यशला सांगितलं आहे की गौरीचा विचार करू नको. माझ्या मनातून अरुंधती आज कायमची उतरली. यापुढे मी तिच्याशी कधीच चांगलं नाही वागू शकणार."
जेव्हा संजना आणि अरुंधती या एकाच घरात राहत होत्या तेव्हा त्या नेहमी एकमेकींना सपोर्ट करताना दिसल्या. मात्र दोघींमध्ये अचानक इतकी कटूता निर्माण झालेली पाहून प्रेक्षकांनीही आश्चर्य व्यक्त केलं आहे. आता मालिकेच्या येणाऱ्या भागात काय घडणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.