Aai Kuthe Kay Karte : रोज पाहता का आई कुठे काय करते ही मालिका? आतापर्यंत झालेत इतके एपिसोड

Last Updated:

टेलिव्हिजनवर अशा फार कमी मालिका आहेत ज्या अनेक वर्ष सुरू राहतात. आई कुठे काय करते ही मालिका त्यापैकी एक आहे.

2019 पासून सुरू आहे आई कुठे काय करते मालिका
2019 पासून सुरू आहे आई कुठे काय करते मालिका
मुंबई : मराठी टेलिव्हिजनची सर्वात प्रसिद्ध मालिका म्हणजे आई कुठे काय करते. या मालिकेनं अल्पावधीत प्रेक्षकांची पसंती मिळाली. आई कुठे काय करते या नावानेचं अनेकांना ही मालिका आपलीशी वाटली. प्रत्येकाच्या आयुष्यातील, घरातील आई ही केंद्रस्थानी ठेवून मांडण्यात आलेली मालिकेची कथा प्रेक्षकांना भावली. ही मालिका मागील 5 वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करतेय. विश्वास बसत नसेल ना. प्रेक्षक मागील 5 वर्षांपासून आई कुठे काय करते या मालिका प्रेक्षक पसंतीच्या यादीत आहे. तुम्ही कधी विचार केलाय का मालिकेचे आतापर्यंत किती एपिसोड झाले असतील?
टेलिव्हिजनवर अशा फार कमी मालिका आहेत ज्या अनेक वर्ष सुरू राहतात. आई कुठे काय करते ही मालिका त्यापैकी एक आहे. मालिकेची कथा अरूंधती या पात्राभोवती फिरणारी आहे. अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर हिनं मालिकेत अरुंधतीची भूमिका साकारली आहे. आई कुठे काय करते ही मालिका अनुपमा या हिंदी मालिकेचा रिमेक आहे.
आई कुछे काय करते ही मालिका दररोज संध्याकाळी 7.30 स्टार प्रवाह या वाहिनीवर टेलिकास्ट होते. 23 डिसेंबर 2019 या दिवशी ही मालिका टेलिव्हिजनवर सुरू झाली. मागील 5 वर्ष ही मालिका टेलिव्हिजनवर पाहायला मिळतेय आणि मालिकेनं नुकतेच 1200 एपिसोड पूर्ण केले. आजवर मालिकेत अनेक नवीन कलाकार आले. पण काही कलाकार आजही मालिकेत पाहायला मिळतात. त्यातील एक म्हणजे मालिकेतील अनघा. अभिनेत्री अश्विनी महांगडे, संजना म्हणजे रूपाली भोसले, अनिरुद्ध म्हणजे अभिनेते मिलिंग गवळी, मालिकेतील यश, अभि, इशा आणि आई आप्पा या सगळ्याच पात्रांनी प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.
advertisement
अभिनेत्री अश्विनी महांगडे हिनं तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर मालिकेचे 1200 एपिसोड पूर्ण झाल्याची माहिती दिली. मालिकेतील कलाकारांनी 1200 एपिसोड पूर्ण केल्याचा आनंद साजरा केला.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
Aai Kuthe Kay Karte : रोज पाहता का आई कुठे काय करते ही मालिका? आतापर्यंत झालेत इतके एपिसोड
Next Article
advertisement
BMC Shiv Sena UBT: बहुमत तुमचं, पण सभागृह आमचं! भाजप-शिंदेंना घाम फोडण्यासाठी ठाकरेंनी निवडला फायरब्रँड शिलेदार
बहुमत तुमचं, पण सभागृह आमचं! भाजप-शिंदेंना घाम फोडण्यासाठी ठाकरेंनी निवडला फायरब
  • राजकीय संघर्षाचे केंद्र महापालिका सभागृहाकडे सरकले आहे.

  • ठाकरे गटाने विरोधी बाकावर बसण्याची तयारी केली असल्याचे चित्र आहे.

  • ठाकरे गटाच्या नगरसेवकांच्या गटनेते पदी आक्रमक चेहरा देण्यात आला आहे.

View All
advertisement