पहलगाम हल्ल्यानंतर देशभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. पाकिस्तानी कलाकारांना भारतात पुन्हा एकदा बॅन करण्यात आले आहे. या हल्ल्यानंतर काश्मीरमधील पर्यटन व्यवस्था विस्कळीत झाली आहे. या राज्याची अर्थव्यवस्था पर्यटनावर अवलंबून आहे. मात्र या घटनेनंतर पर्यटकांनी या शहरांकडे पाठ फिरवली आहे. अशातच काश्मीरमधील रोजगाराला फटका बसू नये यासाठी सरकारसह अनेक सेलिब्रिटींनी काश्मीर आपलेच आहे म्हणत लोकांना तेथे जाण्याचे आवाहन केले आहे. ज्येष्ठ मराठी अभिनेते अतुल कुलकर्णी यांनीही स्वतः काश्मीर आणि पहलगाम येथे जात सर्वांना तेथे जाण्याचे आवाहन केले आहे.
advertisement
Model's Death : 19 वर्षीय मॉडेलने का संपवलं आयुष्य? खोलीत भीषण अवस्थेत आढळला मृतदेह
अशा परिस्थितीत मराठी अभिनेत्री आणि 'द काश्मीर फाइल्स' या चित्रपटाच्या निर्मात्या पल्लवी जोशी यांनी वेगळंच मत मांडलं आहे. त्यांनी इतरांच्या विपरीत काश्मीरला न जाण्याचं आवाहन केलं आहे. याबाबत त्यांनी 'न्यूज १८' कडे त्यांचं स्पष्ट मत व्यक्त केलं आहे. पल्लवी म्हणाल्या, ''जे लोकं आवाहन करत आहेत, त्यांनी जावं तिथे. जे सेलिब्रिटी किंवा राजकारणी काश्मीरच्या पर्यटनाबद्दल आणि त्यांच्या अर्थव्यवस्थेबद्दल बोलत आहेत, ते सुरक्षा यंत्रणा घेऊन तिथे जात आहेत. पण सामान्य पर्यटक सुरक्षा यंत्रणा घेऊन फिरायला जाऊ शकत नाही.''
पल्लवी पुढे म्हणाल्या, "मला माहित आहे तिथे काय परिस्थिती आहे. मी का कोणाला तिथे जाण्यास सांगेन? भारतात इतर कोणती पर्यटनस्थळे नाहीत का? या क्षणी काश्मीरला जाण्याचा विचार तरी येईल का? आणि आलाच तर समोरचा वेड्यात काढेल."
दरम्यान, पल्लवी जोशी यांच्या या वक्तव्याबाबत संमिश्र प्रतिक्रिया समोर आल्या आहेत. अनेकांना त्यांचं म्हणणं पटलं असून काहींनी त्यांच्या वक्तव्यावर नाराजीही व्यक्त केली आहे.