ही आहे प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री सीमा कपूर. सीमा कपूरने ‘नागिन’, ‘एक हजारों में मेरी बहना है’, ‘बिदाई’, ‘हम साथ साथ हैं’ आणि ‘हसरतें’ यांसारख्या टीव्ही मालिकांमधून प्रेक्षकांच्या मनात आपली वेगळी ओळख निर्माण केली. पण ग्लॅमरच्या या जगामागे तिचं बालपण मात्र खूप त्रासदायक होतं. ती आपल्या खाजगी आयुष्याबाबत अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत अत्यंत धक्कादायक खुलासे करत म्हणाली, "माझा सगळ्यात मोठा छळ माझ्या स्वतःच्या आईने केला होता."
advertisement
TV च्या स्टार कपलची कोट्यवधींची फसवणूक, जवळच्या मित्रानेच केलं कंगाल, रडून झाली वाईट अवस्था!
सीमाने सांगितलं की तिच्या आईने तिच्यावर शारीरिक आणि मानसिक दोन्ही प्रकारे अत्याचार केले. "मुलं पायऱ्यांवर तासंतास उभी असायची... पाणी प्यायलाही आम्हाला शेजाऱ्यांकडे जावं लागायचं. पण पुन्हा आई रागवेल म्हणून घाबरायचो". सीमाने लहानपणीचं उदाहरण देताना सांगितलं की, "शेजारी आमच्यावर दया करायचे, ते आम्हाला त्यांच्या घरी बोलवायचे. पण घरी परतल्यानंतर आईची भीती आम्हाला पुन्हा एका वेगळ्या नरकात नेऊन सोडायची."
"आईने माझ्या मनावर इतका खोल घाव केला की, 'आई' या शब्दाचीच भीती वाटायला लागली होती. मी फक्त त्या घरी जायचे जिथे फक्त वडील असायचे. माझे मित्रसुद्धा विचारायचे, ‘तुझी सावत्र आई आहे का?’" सीमा फक्त 6 वर्षांची असताना तिच्या आई-वडिलांमध्ये विभक्त होण्याची वेळ आली. ती आईसोबत राहायला गेली होती, पण आईचं वागणं पाहून ती स्वतःहून तिच्या वडिलांकडे परत गेली. "वडिलांनीच मला खऱ्या अर्थानं सावरलं," असं तिने सांगितलं.
इतकंच नाही, तर लहानपणीचे अनुभव तिच्या प्रेमाच्या आयुष्यावरही परिणाम करत राहिले. "प्रेमात पडायची भीती वाटायची. एकदा मी प्रेमात पडले, पण नंतर कळलं की तो व्यक्ती अजूनही विवाहित आहे. त्याने मला खोटं सांगितलं होतं." आज सीमा कपूर एक यशस्वी कलाकार आहे. तिने टीव्ही इंडस्ट्रीमध्ये आपली एक खास जागा निर्माण केली आहे. पण तिच्या आयुष्यातील ही वेदना, हे दुःख अजूनही तिच्या मनाच्या कोपऱ्यात घर करून आहे.