'राजा राणीची गं जोडी' मालिकेतून प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री शिवानी सोनारने तिचा बॉयफ्रेंड अंबर गणपुळेसोबत लग्नगाठ बांधली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या जोडीच्या लग्नाच्या चर्चा होत्या. त्यांच्या लग्नाआधीच्या विधीही सोशल मीडियावर शेअर व्हायरल होत होत्या. अखेर हे जोडपं लग्नबंधनात अडकलं असून दोघांवर शुभेच्छा आणि आशिर्वादाचा वर्षाव होत आहे.
advertisement
शिवानी आणि अंबरच्या लग्नाची पहिली झलक समोर आली असून फोटोंनी सर्वांचं लक्ष वेधलं आहे. दोघांनी अगदी थाटामाटात लग्न केलं. पारंपारिक पद्धतीने दोघांनी सातफेरे घेतले. दोघांचा मराठमोळा पेहराव चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे.
दरम्यान, लग्नात शिवानीने हिरव्या रंगाची नऊवारी साडी नेसली असून त्यावर भरजरी दागिने घातले आहेत. अंबरने फिकट गुलाबी रंगाचा कुर्ता आणि फिकट हिरव्या रंगाचं धोतर घातलं आहे. दोघेही नववधू आणि वर एकदम सुंदर दिसत आहेत.
