मराठमोळ्या साजशृंगारात साऊथ स्टार रश्मिका मंदाना, रुपेरी पडद्यावर साकारणार महाराणी येसूबाई, First Look
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Rashmika Mandanna First Look In Chhava : 'छावा' या चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांची व्यक्तिरेखा अभिनेता विकी कौशल साकारणार असून महाराणी येसूबाईंच्या भूमिकेत साऊथ स्टार रश्मिका मंदाना दिसणार आहे.
Rashmika Mandanna First Look In Chhava : विकी कौशल आणि रश्मिका मंदाना स्टारर 'छत्रपती' हा चित्रपट लवकरच थिएटरमध्ये दाखल होणार आहे. प्रेक्षकही या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. या सिनेमाचा ट्रेलर पाहिल्यानंतर सगळ्यांचीच उत्सुकता ताणली आहे. खरं तर हा चित्रपट डिसेंबर २०२४ मध्ये रिलीज होणार होता. मात्र 'पुष्पा' सोबत होणारी टक्कर पाहता निर्मात्यांनी या चित्रपटाची तारीख बदलण्याचा निर्णय घेतला.
१४ फेब्रुवारी २०२५ ला 'छावा' चित्रपटगृहांमध्ये धडकणार आहे. या चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांची व्यक्तिरेखा अभिनेता विकी कौशल साकारणार असून महाराणी येसूबाईंच्या भूमिकेत साऊथ स्टार रश्मिका मंदाना दिसणार आहे. या सिनेमाच्या टीजरने इंटरनेटवर धुमाकूळ घातला होता. जबरदस्त ॲक्शनने भरलेल्या या टीजरमधून चित्रपटातील थराराची एक झलक पाहायला मिळाली.
advertisement
काही दिवसांपूर्वी विकी कौशलने त्याच्या फर्स्ट लूकचा पोस्टर सोशल मीडियावर शेअर केला होता. नुकतंच रश्मिका मंदानाचा मराठमोळ्या साजशृंगारात सजलेला पोस्टर रिलीज करण्यात आला आहे. यावेळी ती अतिशय सुंदर आणि घरंदाज दिसत आहे.
advertisement
advertisement
साऊथ स्टार आणि नॅशनल क्रश रश्मिका मंदानाला अशाप्रकारे मराठमोळ्या पारंपारिक पेहरावात पाहून प्रेक्षकांचा उत्साह खूपच वाढला आहे. काही वेळातच या फोटोवर अनेक लाईक्स आणि कमेंट्स आल्या आहेत. आता चित्रपटातील हे ऐतिहासिक पात्र सत्यात उतरवण्यात रश्मिकाला यश येणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
advertisement
दरम्यान, रश्मिका नुकतीच “पुष्पा २” मध्ये दिसली. तिच्या या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर १२२८.९० कोटींचा गल्ला जमवला आहे. अशातच तिने १००० कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश केला आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
January 21, 2025 12:45 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
मराठमोळ्या साजशृंगारात साऊथ स्टार रश्मिका मंदाना, रुपेरी पडद्यावर साकारणार महाराणी येसूबाई, First Look


