नुकतंच एका मुलाखतीमध्ये ऐश्वर्या राय बच्चनने कोहलीबद्दल मनापासून आपली भावना व्यक्त केली. तिने विराटच्या खेळातील जोश, आक्रमकता आणि मैदानावरील उपस्थितीची भरभरून प्रशंसा केली आणि त्याला एक ‘मॅडमॅन फोकस्ड प्लेयर’ असं संबोधलं. तिच्या या विधानाने क्रिकेट आणि सिनेसृष्टीतील प्रत्येक फॅन खुश झाला आहे.
"तो केवळ खेळाडू नाही, तो एक प्रेरणास्थान आहे"
advertisement
याच पार्श्वभूमीवर ऐश्वर्या रायचं मत आहे की, “विराटचा खेळावरचा फोकस, त्याची फिटनेसबाबतची शिस्त आणि मैदानावरील आक्रमकता ही त्याची खरी ओळख आहे. तो तरुण पिढीसाठी एक प्रेरणा आहे.” ती म्हणाली, "फक्त तांत्रिक दृष्टिकोनातून चांगलं असणं पुरेसं नाही, तर आपल्यात एक आंतरिक जिद्द, ऊर्जा आणि निखळ समर्पण असावं लागतं, जे कोहलीमध्ये स्पष्टपणे दिसतं."
विराट कोहलीची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मानेही विराटच्या आक्रमकतेवर तिचं मत व्यक्त केलं होतं. विराट कोहलीचं स्वतःचं शतक असो किंवा सहकारी खेळाडूने काढलेली विकेट असो, विराट कोहली मैदानात आक्रमक होताना दिसतो. त्यामुळे मैदानात आक्रमक असणारा विराट घरात कसा असतो? याबाबत त्याच्या चाहत्यांना नेहमीच कुतूहल आहे. यावर अनुष्का म्हणाली, 'मी भेटलेल्या सर्व लोकांपैकी तो सर्वात शांत आहे. जेव्हा तो मैदानावर नसतो तेव्हा तो खूप आरामशीर राहतो. तो माझ्या ओळखीतला सर्वात शांत माणूस आहे. जेव्हा मी त्याला पाहते तेव्हा मला वाटते, वाह, हा माणूस किती शांत आहे.'
विराट कोहलीने खोटं बोलून मिळवला तमन्ना भाटियाचा नंबर, कॅफेमध्येच करत होता फ्लर्ट, समोर आला VIDEO
सामाजिक माध्यमांवर चाहत्यांचा जल्लोष
दरम्यान, हा व्हिडिओ आणि ऐश्वर्याचे विराटबद्दलचे वक्तव्य समोर आल्यानंतर ट्विटर, इन्स्टाग्रामवर “बॉलीवूड मीट्स क्रिकेट” अशा कमेंट्सचा सोशल मीडियावर पूर आला आहे. अनेक चाहत्यांनी लिहिलं की, “ग्लोबल आयकॉन ऐश्वर्या जर कोहलीच्या जोशावर फिदा झाली असेल, तर त्याचं स्टारडम नक्कीच काही औरच आहे!”
कोहलीचा फॉर्म पुन्हा शिखरावर
सध्या सुरू असलेल्या IPL 2025 स्पर्धेत विराट कोहलीने आपल्या जुन्या फॉर्ममध्ये पुनरागमन केलं आहे. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरुकडून खेळताना त्याने 10 सामन्यांत 443 धावा ठोकल्या असून त्याचं सरासरी 63.29 इतकी आहे. सहा अर्धशतकं आणि 73* अशी सर्वोत्तम खेळी त्याने खेळली आहे. ऑरेंज कॅपच्या स्पर्धेत तो सध्या टॉप-5 मध्ये असून त्याचं सातत्य आणि जोश पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरतंय.