विराट कोहलीने खोटं बोलून मिळवला तमन्ना भाटियाचा नंबर, कॅफेमध्येच करत होता फ्लर्ट, समोर आला VIDEO
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Virat-Tamanna Video : सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये विराट कोहली साऊथ स्टार तमन्ना भाटियासोबत फ्लर्ट करताना दिसत आहे.
मुंबई : क्रिकेट जगतातील सुपरस्टार विराट कोहली फक्त मैदानातच नव्हे, तर कला विश्वातही तितकाच लोकप्रिय आहे. त्याने आजवर अनेक अभिनेत्रींसह अनेक जाहिरातींमध्ये काम केलं आहे. त्यांच्या क्रिकेट फिल्ड बाहेरच्या आयुष्याची चर्चा कायम रंगात असते. सध्या पुन्हा एकदा सोशल मीडियावर त्याच्या एका जुन्या जाहिरातीने धुमाकूळ घातला आहे. या जाहिरातीत विराटसोबत तमन्ना भाटिया असून या दोघांची केमिस्ट्री पाहून चाहते अक्षरशः थक्क झाले आहेत.
हा व्हिडिओ वर्ष २०१२-१३ मधील असून एका डिझायनर शूज ब्रँडसाठी शूट करण्यात आलेला होता. जाहिरातीची सुरुवात एका रेस्टॉरंटमध्ये होते, जिथे विराट आपल्या मित्रांसोबत बसलेला असतो. दुसरीकडे, तमन्ना भाटिया एकटीच फोनवर बोलत असते. पुढे जे घडतं ते खूपच मजेदार आहे. एक मुलगा तमन्नाकडे येतो आणि तिला इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करतो. पण तमन्ना त्याला जोरदार कानाखाली मारते. हे पाहून तिथे असलेला प्रत्येकजण थक्क होतो.
advertisement
यानंतर विराट तिला इम्प्रेस करायला जातो. विराट जाणीवपूर्वक आपला फोन खुर्चीखाली लपवतो आणि "फोन हरवला" असल्याचा अभिनय करतो. तो तमन्नाला विचारतो, "तुम्ही एक कॉल करू शकाल का?" आणि जेव्हा तमन्ना फोन करते, तेव्हा कोहली सहजपणे म्हणतो, “माझ्या फोनमध्ये तुमचा नंबर आहे… डिलीट करू का?” यावर तमन्ना लाजत म्हणते, "ठीक आहे." चाहत्यांना ही छोट्या स्क्रीनवरील केमिस्ट्री फारच गोड वाटतेय.
advertisement
Got this very old Celkon Mobiles ad featuring Tamannaah and Virat.
byu/Hrithik_Ki_Patni inBollyBlindsNGossip
आता पुन्हा एकदा हा व्हिडिओ व्हायरल होत आहे आणि नेटिझन्सच्या प्रतिक्रियाही मजेदार आहेत. एक युजर म्हणतो, “कोहलीची स्क्रीन प्रेझेन्स काही नेपोटिझम स्टार्सपेक्षा खूपच चांगली आहे.” दुसरा लिहितो, “कोहलीने जर अभिनय सुरू केला तर त्याला थिएटरमध्ये पैसे देऊन बघेन!”
advertisement
या जाहिरातीनंतर त्या काळात विराट आणि तमन्नाच्या अफेअरच्या चर्चा देखील रंगल्या होत्या, मात्र दोघांपैकी कोणीही यावर कोणतेही भाष्य केले नाही. या जाहिरातीनंतर पुढे विराटने अनुष्का शर्मासोबत एका 'शॅम्पू अॅड'मध्ये काम केलं, जिथे त्यांची खरी प्रेमकहाणी सुरू झाली.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
May 03, 2025 3:52 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
विराट कोहलीने खोटं बोलून मिळवला तमन्ना भाटियाचा नंबर, कॅफेमध्येच करत होता फ्लर्ट, समोर आला VIDEO