भाजपमध्ये एन्ट्री करताच मालकांकडून राज्यमंत्रिपदाचा दर्जा असलेल्या पदाचा राजीनामा, दादांना झटका
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
Rajan Patil: भाजपमध्ये प्रवेश करताच राजन पाटील यांनी राज्यमंत्री पदाचा दर्जा असलेल्या सहकार परिषदेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.
प्रीतम पंडित, प्रतिनिधी, सोलापूर : राष्ट्रवादीचे माजी आमदार राजन पाटील यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत त्यांनी कमळ हाती घेतले. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने पक्षाला त्याचा फायदा होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे कमळ हाती घेताच त्यांनी राष्ट्रवादीच्या कोट्यातून राज्यमंत्रिपदाचा दर्जा असलेल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
भाजपमध्ये प्रवेश करताच राजन पाटील यांनी राज्यमंत्री पदाचा दर्जा असलेल्या सहकार परिषदेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे त्यांनी आपला राजीनामा सुपूर्द केला.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून मला हे सहकार परिषदेचे अध्यक्षपद मिळाले आहे, त्यामुळे मी माझा राजीनामा देत आहे. माझ्या राजीनामा स्वीकार करावा ही मुख्यमंत्री फडणवीस यांना विनंती, असे राजन पाटील पत्रात म्हणाले.
advertisement
राष्ट्रवादीच्या कोट्यातून पद दिले होते, राजीनामा घ्यावा- राजन पाटील
"सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग, शासन निर्णय दिनांक २७/०१/२०२४ अन्वये माझी महाराष्ट्र राज्य सहकारी परिषदेच्या अध्यक्षपदी माझी नियुक्ती करण्यात आलेले होती. तरी सदरचे पद हे मला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांचे कोट्यातून देण्यात आलेले होते. तरी मी महाराष्ट्र राज्य सहकारी परिषद अध्यक्ष पदाचा राजीनामा स्वखुशीने देत असून सदर राजीनामा मंजूर करण्यात यावा ही नम्र विनंती", असे राजीनाम्याच्या पत्रात राजन पाटील म्हणाले.
advertisement
कोण आहेत राजन पाटील?
सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ मतदारसंघावर सलग तीस वर्षे वर्चस्व
राजन पाटील हे मोहोळचे माजी आमदार आहेत
गेल्या वर्षी म्हणजेच २०२४ साली त्यांना पक्षनिष्ठेचे फळ मिळाले होते
अजित पवार यांनी राजन पाटील यांची महाराष्ट्र सहकार परिषदेच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली होती
पण भाजपमध्ये प्रवेश करताच त्यांनी सहकार परिषदेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला
view commentsLocation :
Solapur,Maharashtra
First Published :
October 29, 2025 9:17 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
भाजपमध्ये एन्ट्री करताच मालकांकडून राज्यमंत्रिपदाचा दर्जा असलेल्या पदाचा राजीनामा, दादांना झटका


