'आई पाणी मागत राहिली, पण मी...', आजारी आईसोबतच्या वागण्याची अभिनेत्याला मोजावी लागली किंमत, त्याच रात्री घडलं भयंकर

Last Updated:
नुकत्याच एका मुलाखतीत अभिनेत्याने त्याच्या आईच्या निधनाशी संबंधित एक अत्यंत भावूक आणि हृदय पिळवटून टाकणारी आठवण सांगितली, जी त्याला आजही सतावत आहे.
1/8
मुंबई: बॉलिवूडमध्ये आपल्या कॉमेडीच्या आणि गंभीर अभिनयाच्या जोरावर ओळख निर्माण केलेला अभिनेता अरशद वारसी याचे जीवन सुरुवातीपासूनच संघर्षमय राहिले आहे. अगदी लहान वयातच म्हणजे अवघ्या १४ व्या वर्षीच त्याने आपले आई-वडील गमावले.

advertisement
2/8
नुकत्याच एका मुलाखतीत अरशद वारसीने त्याच्या आईच्या निधनाशी संबंधित एक अत्यंत भावूक आणि हृदय पिळवटून टाकणारी आठवण सांगितली, जी त्याला आजही सतावत आहे.
नुकत्याच एका मुलाखतीत अरशद वारसीने त्याच्या आईच्या निधनाशी संबंधित एक अत्यंत भावूक आणि हृदय पिळवटून टाकणारी आठवण सांगितली, जी त्याला आजही सतावत आहे.
advertisement
3/8
अरशद वारसीने सांगितले की, वडिलांच्या निधनानंतर त्याच्या आईचे किडनी फेल झाली होती आणि त्यांना नियमितपणे डायलिसिसवर राहावे लागत होते.
अरशद वारसीने सांगितले की, वडिलांच्या निधनानंतर त्याच्या आईचे किडनी फेल झाली होती आणि त्यांना नियमितपणे डायलिसिसवर राहावे लागत होते.
advertisement
4/8
अरशदने सांगितले,
अरशदने सांगितले, "माझी आई एक साधी गृहिणी होती, जी खूप छान स्वयंपाक करायची. तिची किडनी फेल झाली होती. डॉक्टरांनी आम्हाला त्यांना पाणी न देण्याचा सल्ला दिला होता, कारण त्यांचे डायलिसिस सुरू होते. पण, आई वारंवार पाणी मागत होती."
advertisement
5/8
अरशद पुढे म्हणाला,
अरशद पुढे म्हणाला, "मी तिला सतत नकार देत राहिलो. तिच्या निधनाच्या आदल्या रात्री तिने मला पुन्हा बोलावले आणि पाणी मागितले. मी तिला नकार दिला, आणि त्याच रात्री तिचे निधन झाले. ही गोष्ट आजही माझ्या आतून मला हादरवून सोडते."
advertisement
6/8
आईला शेवटच्या क्षणी पाणी न देऊ शकल्याचा अपराधीपणा अरशद वारसीला आजही जाणवतो. तो म्हणाला,
आईला शेवटच्या क्षणी पाणी न देऊ शकल्याचा अपराधीपणा अरशद वारसीला आजही जाणवतो. तो म्हणाला, "माझ्या मनात एक विचार येतो, की जर मी आईला पाणी दिले असते आणि त्यानंतर तिचा मृत्यू झाला असता, तर आयुष्यभर मी याच विचारात राहिलो असतो की माझ्यामुळे तिचा मृत्यू झाला. त्यावेळी मी खूप लहान होतो आणि डॉक्टरांचे ऐकणे मला योग्य वाटले."
advertisement
7/8
पण आज, अरशद वारसीला वाटते की, त्याला डॉक्टरांची भीती न बाळगता आईची इच्छा पूर्ण करायला हवी होती. तो म्हणाला,
पण आज, अरशद वारसीला वाटते की, त्याला डॉक्टरांची भीती न बाळगता आईची इच्छा पूर्ण करायला हवी होती. तो म्हणाला, "आज मला वाटते की मी तिला पाणी पाजायला हवे होते. आज मी मोठा माणूस म्हणून तो निर्णय घेऊ शकतो. आपण अनेकदा आजारी व्यक्तीचा विचार न करता, आपल्या आकलनशक्तीने निर्णय घेतो."
advertisement
8/8
अरशदने सांगितले की, आई-वडिलांच्या निधनानंतर तो लगेच रडला नाही, कारण तो कणखर पुरुष बनण्याचा प्रयत्न करत होता. पण काही आठवड्यांनंतर जेव्हा त्याला अचानक जाणीव झाली की, आई-वडील आता जगात नाहीत, तेव्हा अरशदला रडू कोसळले.

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement