पवन हंस स्मशानभूमीत अंतिम संस्कार
सतीश शाह यांच्या पार्थिवावर आज मुंबईतील विलेपार्ले येथील पवन हंस स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. अंतिम प्रवासापूर्वी त्यांचे पार्थिव वांद्रे येथील त्यांच्या निवासस्थानी अंतिम दर्शनासाठी ठेवले जाईल. यावेळी त्यांचे कुटुंबीय, जवळचे मित्र आणि चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार उपस्थित असतील.
advertisement
गेल्या काही दिवसांत बॉलिवूडने पंकज धीर आणि गोवर्धन असरानी यांसारखे कलाकार गमावले आहेत. याच शोकाकुल वातावरणात सतीश शाह यांच्या जाण्याने इंडस्ट्रीला आणखी एक मोठा धक्का बसला आहे.
अमिताभ बच्चन यांची हृदयस्पर्शी पोस्ट
एकामागून एक मित्रांना गमावल्यामुळे ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन खूप भावूक झाले आहेत. त्यांनी आपल्या ब्लॉग पोस्टमध्ये सतीश शाह यांच्या निधनावर दुःख व्यक्त केले. बच्चन यांनी लिहिले, "आणखी एक दिवस, आणखी एक कार्य, आणखी एक शांतता... आपल्यापैकी आणखी एक जण निघून गेला. सतीश शाह... एक तरुण प्रतिभा... अगदी कमी वयात आपल्याला सोडून गेला."
या कठीण काळात आपण सामान्यपणे व्यक्त होऊ शकत नाही, असे सांगून ते म्हणाले, "या कठीण काळात, 'शो मस्ट गो ऑन' या जुन्या शब्दांचे पालन करण्यातच सहजता आहे. त्याप्रमाणे आयुष्यही तसेच पुढे चालत राहिले पाहिजे."
कलाकारांनी वाहिली श्रद्धांजली
सतीश शाह यांच्या जाण्याने अनेक कलाकारांना मोठा धक्का बसला आहे. माधुरी दीक्षित, हृतिक रोशन, विवेक ऑबेरॉय, करण जोहर, आर माधवन, अली असगर, रणदीप हुड्डा, रणवीर शोरी, सोफी चौधरी, राजकुमार राव आणि परेश रावल यांसह अनेक दिग्गजांनी सोशल मीडियाद्वारे आपल्या लाडक्या सतीश शाह यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.
