विक्की जैन हॉस्पिटलमध्ये ऍडमिट!
सोशल मीडियावर विक्की जैनचे काही फोटो खूप व्हायरल होत आहेत, ज्यात तो हॉस्पिटलच्या बेडवर झोपलेला दिसत आहे. त्याच्या हाताला प्लास्टर लावण्यात आलं आहे, पण नेहमीप्रमाणे त्याच्या चेहऱ्यावर हसू आहे. विक्कीचे हॉस्पिटलमधील फोटो पाहून त्याचे चाहते चिंतेत आहेत.
advertisement
समर्थ जुरेलने शेअर केला व्हिडिओ!
विक्कीच्या तब्येतीची माहिती ‘लाफ्टर शेफ’ शोमधील त्याचा मित्र समर्थ जुरेलने दिली आहे. समर्थने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात तो विक्कीसाठी लवकर बरं होण्यासाठी प्रार्थना करत आहे. या व्हिडिओमध्ये अंकिता लोखंडेही विक्कीच्या बाजूला उभी असलेली दिसत आहे.
सुपरस्टारच्या Ex गर्लफ्रेंडच्या प्रेमात पडला अभिनेता, उद्ध्वस्त झालं करिअर, एका चुकीमुळे सगळंच संपलं
'बिग बॉस १८' मध्ये पहिल्यांदा विक्की जगसमोर आला. त्याने आपल्या बुद्धीने हा खेळ खेळला. यावेळी अंकिता आणि विक्की यांच्यातील आंबट-गोड नातं सर्वांसमोर आलं. अनेकदा त्यांच्यात खटके उडाले. इतकंच नाही, तर शो संपल्यानंतर दोघेही वेगळे होतील असंही अनेकांनी म्हटलं, पण हे जोडपं अजूनही एकत्र आहे. यानंतर ही जोडी लाफ्टर शेफ या कार्यक्रमातही पाहायला मिळते. चाहते त्यांच्यावर प्रेमाचा वर्षाव करत असतात. अशातच आता विक्कीची अशी अवस्था पाहून चाहते तो लवकरात लवकर बरा व्हावा यासाठी प्रार्थना करत आहेत.