नुकताच 'अनुपमा'चा एक सीन सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक अतिशय रोमँटिक सीन दाखवण्यात आला आहे, ज्यामध्ये राही आणि प्रेम ब्लँकेट पांघरून एकत्र रोमान्स करत आहेत. हा सीन व्हायरल झाल्यानंतर शोच्या निर्मात्यांना लोकांच्या टीकेला सामोरे जावे लागले. लोकांनी या शोला 'बी-ग्रेड' म्हटले आहे आणि सांगितले की आता टीव्ही शो देखील आता ओटीटीमध्ये बदलत आहेत.
advertisement
या व्हिडिओवर कमेंट करताना एका युजरने लिहिले की, 'हे राजन शाही आणि शोचे कलाकार मिळून आमची संस्कृती बिघडवण्याच्या तयारीत आहेत.' दुसऱ्या युजरने लिहिले की, 'टीव्ही शोवर सेन्सॉरशिप असावी. हे खरोखर खूप महत्त्वाचे आहे.' तिसऱ्या युजरने लिहिले की, 'रुपाली गांगुलीचा शो आता कंटेंटनुसार नाही तर असे सीन्स दाखवून टीआरपी गोळा करेल. हे दृश्य खरंच खूप वाईट आहे.'
निर्माते राजन शाही याआधीही लोकांच्या टीकेचे शिकार झाले आहेत. कलाकारांना न कळवता रातोरात त्यांना शोमधून बाहेर फेकल्याचा आरोप राजन यांच्यावर करण्यात आला आहे. अलीकडे, काही वादांमुळे, अनेक कलाकार शोमधून बाहेर पडले होते, ज्याचे स्पष्ट कारण माहीत नाही.