अर्चना पूरन सिंह आणि परमीत सेठी यांच्या व्लॉग्समध्ये त्यांचे दोन्ही मुलगे आर्यमान आणि आयुष्मान देखील दिसतात. नुकत्याच शेअर केलेल्या एका व्लॉगमध्ये आर्यमानने दिल्ली ट्रिपचा एक मजेदार पण थोडा शॉकिंग अनुभव सांगितला, जिथे त्याला आई-वडिलांच्या स्टारडमचा फटका बसला.
अर्चना-परमीतमुळे आर्यमनला खावा लागला मार
अर्चनाच्या चॅनलवर आलेल्या या नवीन व्लॉगमध्ये, हे कुटुंब दिल्लीतील गल्ल्यांमध्ये फिरून सर्वात चांगली चाट शोधताना दिसते. पण चाटपेक्षा जास्त लक्ष वेधून घेते ती अर्चना-परमीत यांना पाहण्यासाठी जमलेली प्रचंड गर्दी. जेव्हा आर्यमान कारमधून खाली उतरतो, तेव्हा अर्चना त्याला गंमत करत म्हणते, "तुला तर तसंही कोणी ओळखत नाही!" जेव्हा तिघेही आपल्या कारकडे परतत होते, तेव्हा अर्चना आणि परमीत यांना गर्दीने घेरले होते. मात्र, यावेळी आर्यमानला जबरदस्त धक्के आणि मार बसला.
advertisement
गर्दीतून धक्के खाल्ल्यानंतर आर्यमानने व्लॉगमध्ये हसून पण थोड्याशा नाराजीच्या स्वरात आपला अनुभव सांगितला. आर्यमान संतापून म्हणाला, "मम्मा आणि पापांना लोक प्रेमाने भेटतात. 'मॅम... सर...' असे म्हणतात. पण माझ्यासोबत काय? माझ्या बूटांवर पाय ठेवले, धक्के मारले, चक्क कानाखालीही मारले! आणि फोटोसाठी विचारतात. मी म्हणालो, आता नाही फोटो काढणार! हे काय चाललंय?"
आर्यमानने मस्करीत कबूल केले की, चाहत्यांच्या गर्दीत त्याला स्वतःची ओळख आई-वडिलांच्या स्टारडमच्या खूप मागे असल्याचे जाणवले आणि त्याचे आई-वडीलच कुटुंबाचे खरे सुपरस्टार आहेत.
अर्चना-परमीत यांची कारकीर्द
अर्चना पूरन सिंह यांनी 'निकाह' चित्रपटातील छोट्या भूमिकेतून करिअरची सुरुवात केली. 'राजा हिंदुस्तानी', 'कुछ कुछ होता है' आणि नंतर 'द कपिल शर्मा शो' मुळे त्या घराघरात पोहोचल्या. परमीत सेठी यांनी 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे' मधून अभिनयात पदार्पण केले, तर टीव्हीवर 'जस्सी जैसी कोई नहीं' मुळे ते लोकप्रिय झाले. १९९२ मध्ये लग्न केलेले हे दोघे आजही त्यांच्या व्लॉग्समुळे प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत.
