व्हायरल झालेले फोटो पाहून चाहत्यांनी पुन्हा या जोडप्याचे अभिनंदन करायला सुरुवात केली. बेबी दुआच्या गोंडसपणाचे कौतुक करू लागले. चाहते आनंदी होऊ लागले, बाळाची एक झलक पाहण्यासाठी ते अधीर झाले होते, अखेर त्यांना ती दिसली. पण खूप आनंदी होऊ नका. ही सर्व बनावट छायाचित्रे आहेत. दीपिका किंवा रणवीर सिंग दोघांनीही हे फोटो शेअर केलेले नाहीत.
advertisement
रणवीर सिंग-दीपिका पदुकोणचा हा फॅमिली फोटो फेक आहे. हे फोटो AI च्या मदतीने तयार करण्यात आले आहे. या फोटोंमध्ये रणवीर आणि दीपिकाचे चेहरे दुसऱ्या स्त्री-पुरुषाच्या धडांशी जोडलेले आहेत. दीपिका-रणवीरच्या या फोटोंमध्ये काहीही तथ्य नाही. ते बनावट आहेत.
अलीकडेच, बाळाच्या जन्मानंतर, दीपिका पदुकोण पहिल्यांदाच बेंगळुरूमध्ये दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टमध्ये सहभागी झाली होती. सैल पांढरा टॉप आणि ब्लू जीन्स परिधान करून ती आनंदाने नाचताना आणि मैफिलीचा आनंद लुटताना दिसली. दीपिका दिलजीतसोबत स्टेजवर सामील झाली. तिने 'नमस्कारम बेंगळुरू' म्हणत बेंगळुरू प्रेक्षकांना अभिवादन केले आणि त्यांच्याशी कन्नडमध्ये संवाद साधला.
