पण आता बाबिलच्या कुटुंबाने आणि मॅनेजमेंट टीमने यावर अधिकृत स्पष्टीकरण दिलं आहे. हिंदुस्तान टाइम्सच्या रिपोर्टनुसार, बाबिलच्या कुटुंबाने एक निवेदन जारी करत सांगितलं की, “बाबिल पूर्णपणे सुरक्षित आहे आणि सध्या केवळ एक कठीण टप्पा अनुभवतो आहे. तो देखील आपल्यासारखाच एक तरुण आहे, ज्याला कधी कधी मानसिक आरोग्याची लढाई लढावी लागते.”
advertisement
व्हिडिओतील ‘त्या’ नावांचा खुलासा
व्हिडिओमध्ये बाबिलने अनन्या पांडे, शनाया कपूर, सिद्धांत चतुर्वेदी, अर्जुन कपूर, आदर्श गौरव, राघव जुयाल आणि गायक अरिजीत सिंह यांची नावे घेतली होती. यावरही स्पष्टीकरण देत बाबिलच्या कुटुंबाने सांगितले की, “बाबिलने ही नावे कोणावर आरोप करण्यासाठी नाही, तर त्यांच्या प्रामाणिक कामगिरीबद्दल कौतुक म्हणून घेतली होती. हे सर्व कलाकार इंडस्ट्रीमध्ये सकारात्मक बदल घडवत आहेत आणि बाबिल त्यांच्याबद्दल आभारी आहे.”
सुरु होणार होतं शूटिंग
राघव जुयालने ई-टाइम्सला दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी बाबिलच्या आई सुतापा सिकदर यांच्याशी संपर्क साधला होता. त्यानुसार, “बाबिल हैदराबादमध्ये होता आणि त्याला पुढच्या दिवसापासून शूटिंगला सुरुवात करायची होती. मात्र त्याला एंग्जायटीचा दौरा आला. त्यामुळे आता तो घरी परत येत आहे आणि सध्या विश्रांती घेत आहे.”
राघवने पुढे सांगितले, “सुतापा मॅडमनी स्पष्ट केलं की बाबिलला या काळात आधाराची गरज आहे. तो एक संवेदनशील मुलगा आहे, ज्याला आपल्या भावना व्यक्त करायची सवय आहे. पण त्याचे शब्द तुकड्यातून पाहून चुकीचा अर्थ लावला जातोय.”
इंडस्ट्रीकडून पाठिंबा
या घटनेनंतर अनेक कलाकारांनी बाबिलच्या पाठिशी उभं राहायचं ठरवलं आहे. अनेकांनी मानसिक आरोग्याच्या गंभीरतेवर पुन्हा एकदा लक्ष वेधलं आहे. इंडस्ट्रीतील स्पर्धात्मक वातावरण, प्रेशर, अपेक्षा यामुळे तरुण कलाकारांसमोर अनेक वेळा मानसिक आरोग्याचं संकट उभं राहतं. बाबिलचा हा प्रसंग याचं एक उदाहरण आहे.
चाहत्यांना अपील
बाबिलच्या कुटुंबाने आणि मॅनेजमेंट टीमने शेवटी एक विनंती केली आहे की, “कृपया व्हिडिओच्या फक्त काही सेकंदांचा संदर्भ घेऊन निष्कर्ष काढू नका. बाबिलला समजून घ्या, त्याला वेळ द्या. त्याचं मनोबल वाढवा.”
