सौंदर्य आणि बोल्डनेसचा हॉट तडका
कलर्स मराठीने नुकताच एक प्रोमो प्रसिद्ध केला असून त्यात एक अभिनेत्री अत्यंत ग्लॅमरस अंदाजात डान्स करताना दिसत आहे. या प्रोमोला कॅप्शन दिलंय, "सौंदर्य आणि बोल्डनेस घेऊन घरातलं वातावरण हॉट-हॉट करायला येतेय ही नखरेल गर्ल..." प्रोमोमध्ये तिचा चेहरा जरी गुलदस्त्यात असला, तरी तिच्या मादक हालचालींनी आणि सादरीकरणाने चाहत्यांना घायाळ केलं आहे. पण एका हुशार नेटकऱ्याने तिच्या कंबरेवरचा टॅटू पाहिला आणि क्षणात ओळखलं की ही दुसरी तिसरी कोणी नसून सोनाली राऊत आहे.
advertisement
कोण आहे ही सोनाली राऊत?
सोनाली राऊत हे नाव बिग बॉसच्या चाहत्यांसाठी नवीन नाही. तिने याआधी सलमान खानच्या 'बिग बॉस ८' मध्ये धुमाकूळ घातला होता. 'द एक्सपोज' आणि 'ग्रेट ग्रँड मस्ती' यांसारख्या बॉलिवूड चित्रपटांतून आपल्या बोल्डनेसची चुणूक दाखवणारी सोनाली आता मराठी प्रेक्षकांचं मनोरंजन करायला सज्ज झाली आहे. हिंदी बिग बॉसमध्ये ती आपल्या रोखठोक वागण्यासाठी आणि भांडणांसाठी प्रसिद्ध होती, त्यामुळे मराठीच्या घरात ती काय धिंगाणा घालणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.
केवळ सिनेसृष्टीतील चेहरेच नाही, तर यंदा सोशल मीडिया गाजवणारे रीलस्टार्स् सुद्धा घरात एन्ट्री घेणार आहेत. सोनालीच्या प्रोमोसोबतच एका लोकप्रिय रीलस्टारचाही सूचक प्रोमो समोर आला आहे. "सोशल मीडियावर ज्यांच्या एका व्हिडिओसाठी लाखो लोक वाट पाहतात, तो गडी आता थेट बिग बॉसच्या घरात दिसणार," अशी चर्चा रंगली आहे. यामुळे यंदाचा सीझन जबरदस्त ठरणार आहे.
उरले फक्त ३ दिवस
११ जानेवारी २०२६ रोजी रात्री ८ वाजता रितेश देशमुख या खेळाचा श्रीगणेशा करतील. या महासोहळ्यात सोनाली राऊत आपला तोच 'बोल्ड' अवतार घेऊन मंचावर येते का, हे पाहणं रंजक ठरेल. यासोबतच राधा मुंबईकर सारख्या नृत्यांगनेच्या नावाचीही चर्चा जोरात आहे.
