TRENDING:

BBM6: करण सोनावणेने लावली काडी, पहिल्याच दिवशी घरात महाभारत! तन्वी आणि रुचितामध्ये जुंपली, नेमकं काय घडलं?

Last Updated:

'बिग बॉस' चा दणक्यात प्रीमियर झाला आणि अवघ्या २४ तासांत घराचं रूपांतर रणांगणात झालंय. पहिल्याच दिवशी तन्वी कोल्ते आणि रुचिता जामकर यांच्यातील वाद पाहून प्रेक्षकांनी अक्षरशः तोंडात बोटं घातली आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई: 'बिग बॉस'चं घर आणि तिथे राडा होणार नाही, असं कधी शक्य आहे का? पण यंदाच्या सहाव्या पर्वात तर हद्दच झाली. ११ जानेवारीला दणक्यात या शोचा प्रीमियर झाला आणि अवघ्या २४ तासांत घराचं रूपांतर रणांगणात झालंय. रितेश देशमुख यांनी "दार उघडणार, नशिबाचा गेम पालटणार" असं म्हणत स्पर्धकांना आत पाठवलं खरं, पण पहिल्याच दिवशी तन्वी कोल्ते आणि रुचिता जामकर यांच्यातील वाद पाहून प्रेक्षकांनी अक्षरशः तोंडात बोटं घातली आहेत.
News18
News18
advertisement

स्विमिंग पूल, थट्टा आणि वादाची ठिणगी

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या प्रोमोमध्ये दिसतंय की, करण सोनवणे आणि रुचिता जामकर गार्डन एरियात बसून गप्पा मारत आहेत. यावेळी ते दोघे घरातील स्विमिंग पूल विषयी बोलताना दिसत आहेत. करण आपल्या मिश्किल शैलीत म्हणतो, "स्विमिंगमध्ये गेल्यावर आपण थोडंफार पाणी पितोच ना... उगाच फालतूमध्ये..." असं म्हणत तो बुडण्याचा अभिनय करून दाखवतो. रुचिता त्याच्या या जोकवर हसते.

advertisement

शंभर दिवसांचा थरार, नशिबाचा जुगार; बिग बॉस मराठी 6 मध्ये 'हे' 17 शिलेदार भिडणार; स्पर्धकांची संपूर्ण यादी!

मात्र, तिथे जवळच उभी असलेल्या तन्वी कोल्तेला हे 'फालतू' शब्द जिव्हारी लागतो. ती त्याला मध्येच टोकते आणि म्हणते, "तू फालतूमध्ये असं म्हणू नकोस." इथूनच वादाची ठिणगी पडली. रुचिताला तन्वीचं असं मध्येच बोलणं अजिबात आवडत नाही. ती तडक उत्तर देते, "ही नेहमी टपलेलीच असते, कोण काय बोलतंय याकडे हिचं लक्ष असतं आणि ही शस्त्र घेऊनच तयार असते." यावर तन्वीचा पारा चढतो आणि ती ओरडून सांगते, "तू लिमिट क्रॉस करू नकोस!"

advertisement

यावर मात्र रुचिताचा राग अनावर होतो. ती तन्वीला थेट बिनडोक म्हणते आणि रागाच्या भरात "तुझं तोंड शेणात घाल" असं अतिशय टोकाचं विधान करते. पहिल्याच दिवशी अशा प्रकारची भाषा वापरली गेल्यामुळे घराघरातील प्रेक्षकही थक्क झाले आहेत.

बिग बॉसचा पहिलाच दणका आणि कठोर शिक्षा

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
संक्रांतीची खरेदी बाकीये? खरेदी करा वस्तू, पुण्यात इथं भरलंय प्रदर्शन, Video
सर्व पहा

नुसती भांडणंच नाहीत, तर पहिल्याच दिवशी स्पर्धकांनी बिग बॉसच्या नियमांची पायमल्ली केल्याचं दिसतंय. घरात प्रवेश करतानाच 'शॉर्टकट' की 'कष्टाचा मार्ग' असे दोन पर्याय देण्यात आले होते. यावरूनही स्पर्धकांमध्ये गटबाजी सुरू झाली आहे. प्रीमिअरनंतर दाखवण्यात आलेल्या प्रोमोनुसार, स्पर्धकांनी केलेल्या एका मोठ्या चुकीमुळे बिग बॉसने पहिल्याच दिवशी संपूर्ण घराला कठोर शिक्षा सुनावली आहे. यामुळे आता सदस्यांची झोप उडणार हे नक्की.

advertisement

मराठी बातम्या/मनोरंजन/
BBM6: करण सोनावणेने लावली काडी, पहिल्याच दिवशी घरात महाभारत! तन्वी आणि रुचितामध्ये जुंपली, नेमकं काय घडलं?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल