बॉलिवूड हंगामाच्या रिपोर्टनुसार, सेन्सॉर बोर्डाने चित्रपटातील अश्लीलता जास्त असलेल्या काही दृश्यांना आणि विशिष्ट डायलॉग्सना विरोध केला. त्यानंतर निर्मात्यांनी ते बदलले. अशा प्रकारे, एकूण ३९ सेकंदांचे सीन्स आणि डायलॉग्स चित्रपटातून वगळण्यात आले आहेत. यानंतर 'मस्ती ४' ला 'ए' रेटेड सर्टिफिकेट (A/Certificate) मिळाले आहे. म्हणजे हा चित्रपट केवळ १८ वर्षांवरील प्रेक्षकांसाठीच आहे.
advertisement
चित्रपटाची लांबी कमी झाली
सेन्सॉर बोर्डाच्या आदेशानंतर, चित्रपटाची लांबी आता कमी झाली आहे. कटनंतर आता 'मस्ती ४' ची एकूण लांबी २ तास २४ मिनिटे १७ सेकंद इतकी राहिली आहे. 'मस्ती ४' चा ट्रेलर पाहिल्यावरच अनेकांना वाटले होते की, यात डबल मिनिंग डायलॉग्सची आणि अशलील दृश्यांची इतकी भरमार आहे की सेन्सॉर बोर्ड नक्कीच ॲक्शन घेईल, आणि तसेच झाले.
'मस्ती ४' मधून तिकडी परतली!
या चित्रपटातून अभिनेता रितेश देशमुख, आफताब शिवदासानी आणि विवेक ओबेरॉय यांची लोकप्रिय कॉमेडी तिकडी पुन्हा एकदा प्रेक्षकांना हसवायला येत आहे. 'मस्ती ४' चित्रपट जगभरातील चित्रपटगृहांमध्ये २१ नोव्हेंबर २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे.
