TRENDING:

BBM 6 : बस निकल गयी हवा! स्वत:ला वाघिण म्हणणारी 'सरकार' पहिल्याच टास्कला बेशुद्ध, नेटकऱ्यांनी घेतली शाळा

Last Updated:

बिग बॉस मराठी 6 च्या आजच्या भागाचा प्रोमो समोर आला आहे ज्यात टास्क पाहून स्वत:ला वाघिण म्हणण्याऱ्या सरकारच्या म्हणजेच दिव्या शिंदेच्या नाकी नऊ आल्याचं पाहायला मिळतंय.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
बिग बॉस मराठी 6 चा ग्रँड प्रीमियर दणक्यात पार पडला. त्यानंतर घरात गेलेल्या 17 स्पर्धकांनी पहिल्याच दिवशी चांगलाच धुमाकूळ घातला आहे.  पहिल्या दिवसापासूनच रुचिता जामदार आणि तन्वी कोलते यांच्यात चांगलीच भांडणं झाली. तर दुसरीकडे अभिनेता विशाल कोटियनमुळे प्रभू शेळके भावुक झाला. आता घरातला पहिलाच टास्क आजच्या भागात पाहायला मिळणार आहे. या भागाचा प्रोमो समोर आला आहे ज्यात टास्क पाहून स्वत:ला वाघिण म्हणण्याऱ्या सरकारच्या म्हणजेच दिव्या शिंदेच्या नाकी नऊ आल्याचं पाहायला मिळतंय. सरकारची नेटकऱ्यांनी चांगलीच शाळा घेतली आहे.
News18
News18
advertisement

बिग बॉसच्या नव्या प्रोमोमध्ये पाहायला मिळतंय, बिग बॉसने स्पर्धकांना राशन टास्क दिला आहे. 'मिशन राशन' हा आठवड्याच्या राशनसाठी सर्व स्पर्धकांना हा टास्क पूर्ण करावा लागणार आहे. 'मेहनतीचं दार' निवडून घरात आलेले काही स्पर्धक या टास्कमध्ये खेळताना दाखवले आहेत.

( प्रभू शेळकेला आठ वर्षांपासून गंभीर आजार, 'काळू डॉन'च्या उपचारासाठी वडिलांनी विकलंय वावर, नेमकं झालंय काय )

advertisement

स्टोअर रूममधून मोठी भांडी ठेवली आहेत जी गार्डन एरियामध्ये घेऊन यायची आहेत. ज्यात मोठे टोप, झाकणं, चमचे आणि बरंच काही दिवस आहेत. काही जण भांडी बाहेर काढत आहेत काही ती नीट लावताना दिसत आहेत. प्रभू शेळके स्विमिंग पूलमधून पाणी काढताना दिसतोय. हा टास्क प्रचंड मेहनतीचा असल्याचं दिसतंय. पण एवढी मोठी भांडी पाहून सरकारच्या मात्र पोटात गोळा आला. टास्क संपताच ती बेशुद्ध होताना दिसतेय. बिग बॉस डॉक्टर म्हणून कोणीतरी ओरडताना दिसतंय.

advertisement

प्रोमोच्या शेवटची सरकार म्हणजेच दिव्या शिंदे म्हणते, इतकी भांडी आहेत म्हणजे काय अख्ख्या जिल्ह्याची भांडी दिलीत का घासायला? त्यानंतर ती जमिनीवर कोसळले.  'मिशन राशन' टास्कमध्ये दिव्याची प्रकृती बिघडल्याचे प्रोमोमधून पाहायला मिळत आहेत.

या प्रोमोवर सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू झाली आहे. अनेक नेटकऱ्यांनी दिव्या शिंदेच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त करत तिला सपोर्ट केला आहे. मात्र काहींनी तिला चांगलंच ट्रोल केलं आहे. एकानं लिहिलंय, 'मेहनतीचं दार स्वतः निवडलं आणि पहिल्याच टास्कला बेशुद्ध पडली'. दुसऱ्यानं लिहिलंय, 'दिव्या मॅडम बेशुद्ध पडायला आल्या'. आणखी एकानं लिहिलंय, 'बस निकल गयी हवा'

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
संक्रांतीच्या आधी भोगी का साजरी करतात? भोगीच्या भाजीची परंपरा काय? Video
सर्व पहा

आता दिव्या शिंदेला नेमकं काय झालं, घरात डॉक्टर येणार का, आणि हा टास्क पूर्ण होणार की रद्द केला जाणार हे सगळं आजच्या भागात पाहायला मिळणार आहे.

मराठी बातम्या/मनोरंजन/
BBM 6 : बस निकल गयी हवा! स्वत:ला वाघिण म्हणणारी 'सरकार' पहिल्याच टास्कला बेशुद्ध, नेटकऱ्यांनी घेतली शाळा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल