'पुष्पा 2' च्या प्रदर्शनादरम्यान संध्या थिएटरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणात अल्लू अर्जुनला नामपल्ली कोर्टाने अभिनेत्याला जामीन मंजूर केला आहे. नामपल्ली कोर्टात आज संध्या थिएटर चेंगराचेंगरी प्रकरणी सुनावणी झाली. त्यानंतर न्यायालयाने अल्लू अर्जुनच्या बाजूने निर्णय दिला आणि अभिनेत्याला जामीन मंजूर केला.
Allu Arjun Arrest: अल्लू अर्जुनला अटक का झाली? काय आहे संपूर्ण प्रकरण? वाचा एका क्लिकवर
advertisement
न्यायालयाने अल्लू अर्जुनला जामीन अटींचा भाग म्हणून प्रत्येकी 50,000 रुपयांचे दोन जामीन सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे आता अल्लू अर्जुनला मोठा दिलासा मिळाला असून चेंगराचेंगरी प्रकरणात कोर्टाने त्याच्या बाजूने निर्णय दिला आहे.
दरम्यान, 4 डिसेंबर रोजी हैदराबादच्या संध्या थिएटरमध्ये पुष्पा-2 प्रदर्शित झाला. पुष्पा-2 चित्रपटाच्या प्रीमियरवेळी चेंगराचेंगरी झाली होती. या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाला होता. याच संदर्भात अल्लू अर्जुनविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. हैदराबाद चेंगराचेंगरीप्रकरणीच पोलिसांनी कारवाई करत अल्लू अर्जुनला अटक केली आहे. अल्लू अर्जुन पोलिसांना न सांगता प्रीमियरला गेला होता, असा पोलिसांचा आरोप होता.
