अभिनेत्री अंकिता लोखंडे घरातील इतर सदस्यांबरोबर गप्पा मारत असते. तेव्हा ती सांगते की विक्कीने तिला प्रपोज केल्यानंतर एक वर्षासाठी तो गायब झाला होता. अंकितानं हे सांगितल्यानंतर सगळे तिला तिच्या आणि विक्कीच्या लव्हस्टोरीबद्दल विचारतात.
हेही वाचा - बोल्ड सीन करण्यासाठी किती पैशांची असते ऑफर? समोर आलं कटू सत्य
अंकितानं सांगितलं, 'आमच्यात प्रपोज असं काही झालं नव्हतं. विक्कीनं मला थेट लग्नाची मागणी घातली होती'. विक्की घर सोडून गेला तेव्हा तू त्याची वाट पाहिलीस का? असं घरातले विचारतात. त्यावर अंकिता सांगते, 'हो तो एक वर्षांसाठी गायब झाला होता. पण एक वर्षांनी तो जेव्हा परत आला तेव्हा आम्हाला माहिती होतं की आम्ही लग्न करणार आहोत. विक्की तेव्हा माझ्यामुळे निघून गेला होता'.
advertisement
विक्कीआधी अंकिताचं दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतबरोबर अफेअर होतं. दोघे अनेक वर्ष एकमेकांना डेट करत होते. पवित्र रिश्ता या मालिकेदरम्यान ते प्रेमात पडले. दोघे लिव्ह-इनमध्ये राहत होते. सुशांतबरोबर ब्रेकअप झाल्यानंतर अंकिताला विक्कीनं त्यातून बाहेर काढलं असं तिनं अनेकदा सांगितलं आहे.
विक्की आणि अंकिता यांनी 14 डिसेंबर 2021 रोजी लग्न केलं. दोघांनी मुंबईत ग्रँड वेडिंग केली होती. दोघांनी लग्नासाठी जवळपास 50 कोटी रूपयांहून अधिक खर्च केला होता. एकता कपूरनं अंकिताला लग्नात गिफ्ट म्हणून डायमंड दिले होते. ज्याची किंमत जवळपास 50 लाख रूपये होती.