बोल्ड सीन करण्यासाठी किती पैशांची असते ऑफर? समोर आलं कटू सत्य
- Published by:Minal Gurav
Last Updated:
एका सेक्स सीनमुळे तृप्ती डिमरी कमालीची फेमस झाली. असा सीन्ससाठी कलाकार किती मानधन घेतात माहितीय का?
मुंबई, 13 डिसेंबर : आजकाल कोणताही सिनेमा किंवा वेब सीरिज पाहायचं ठरवलं तर त्यात बोल्ड सीन्स हे असतातच. बोल्ड सीन्स नसतील तर सिनेमाच होत नाही. सिनेमा म्हटलं की बोल्ड सीन्स आले असं जणू काही समीकरणच झालं आहे असं म्हणावं लागेलं. नुकत्याच रिलीज झालेल्या अॅनिमल सिनेमातील बोल्ड सीन्सची सध्या चर्चा आहे. अभिनेता रणबीर कपूरनं अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि अभिनेत्री तृप्ती डिमरी यांच्याबरोबर काही सेक्स सीन्स दिले आहेत. सिनेमातील सेक्स सीन्सची चर्चा आहे. सेक्स सीन्स किंवा बोल्ड सीन्स असलेला अॅनिमल हा बॉलिवूडचा पहिलाच सिनेमा नाही. याआधी देखील बोल्ड सीन्स असलेले अनेक सिनेमे येऊन गेले आहेत. पण हे बोल्ड सीन्स करण्यासाठी कलाकारांना किती पैसे मिळत असतील? असा विचार तुम्ही कधी केलाय का? कलाकारांना नेमकी किती पैशांची ऑफर असते याची माहिती समोर आली आहे.
एखाद्या कलाकाराबरोबर बोल्ड सीन्स करणं काही सोप नसतं. अभिनेत्रींसाठी तर ते अनेकदा मुश्किल होऊन बसतं. एकदा एखादा बोल्ड सीन केला तर एक शिक्का कलाकारांवर बसतो. अभिनेत्री तृप्ती डिमरीनं अॅनिमल सिनेमात केलेल्या सेक्स सीनची खूप चर्चा होतेय. एका सेक्स सीनमुळे तृप्ती डिमरी कमालीची फेमस झाली पण तिच्यावर तितकीच टीका देखील केली जाते. तिचे आई वडील देखील तिच्या या सीनवर नाराज असल्याचं समोर आलं आहे.
advertisement
हेही वाचा - चुकूनही फॅमिलीबरोबर OTTवर पाहून नका 'या' 10 फिल्म्स! नुसत्या बोल्ड नाही तर आहेत महाबोल्ड
बोल्ड सीन किंवा सेक्स सीन करण्यासाठी कलाकार सर्वाधिक मानधन आकारतात असं ऐकीवात आहे. कलाकार प्रत्येक सीन नुसार मानधन घेतात असंही म्हटलं जातं. 70-90च्या दशकातील अनेक सिनेमांमध्ये बोल्ड सीन्स पाहायला मिळतात. अभिनेता इमरान हाशमी तर मोठ्या पडद्यावरील रोमान्सचा बादशहा आहे असं देखील म्हटलं जातं. एक बोल्ड सीन करण्यासाठी हे कलाकार नेमके किती पैसे घेत असतील ?
advertisement
talentrack.in वरील माहितीनुसार, एक अभिनेत्री एखाद्या OTT प्लॅटफॉर्मवरील वेब सीरिजमध्ये बोल्ड सीन देत असेल तर एका एपिसोडसाठी तिला 2-2.5 लाख रूपये मिळतात. यात बोल्ड आणि इंटिमेट सीन्स असतात. जर तुम्हाला बोल्ड सीन करण्यात कम्फर्ट वाटत असेल तरच करा असं आधीच टीमकडून सांगण्यात येत.
त्याचप्रमाणे OTT प्लॅटफॉर्मवर रिलीज होणाऱ्या बोल्ड वेब सीरिजसाठी एखाद्या अभिनेत्याला पर एपिसोडसाठी 2-2.5 लाख रूपये मानधन दिलं जातं. जर कलाकार फार प्रसिद्ध असतील तर हे मानधन वाढतं. अभिनेता इमरान हाशमी त्याच्या एका सिनेमासाठी 10 कोटी रूपये मानधन घेतो.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 13, 2023 10:45 AM IST